पुणे - पुण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी आणि त्यांची पत्नी आज कोरोनामुक्त झालेले आहेत. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. दोघांचे ही १४ दिवसानंतर अहवाल हे निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, त्यांच्या निवासस्थानी पोहचताच तेथील नागरिकांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले आणि प्रोत्साहन दिले.
पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यास असलेल्या मात्र पुणे पोलीस दलात काम करणाऱ्या ४२ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, त्यांच्या पत्नीला देखील बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांना महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती. त्यानंतर तेथील पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. डॉक्टरांनी केलेले उपचार याच्यामुळे पोलीस कर्मचारी हे वेळेत बरे झाले असून त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. दरम्यान, कोरोनामुक्त पोलीस कर्मचारी सोसायटीमध्ये दाखल होताच टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले गेले. यामुळे त्यांचे मनोबल नक्कीच वाढेल. हेही वाचा - परराज्यात जाण्यासाठी कामगारांची गर्दी; शिक्रापूर परिसरात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा