पुणे - राज्य सरकारने तिन्ही झोनमध्ये दारूची दुकाने सुरू होणार असल्याचे आदेश काढले. त्यानंतर मद्यपींनी पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर येथे वाईनशॉपच्या बाहेर पहाटेपासून रांगाल लावल्या होत्या. मात्र, स्थानिक पातळीवर आदेश न आल्याने दारूची दुकाने उघडली नाही. त्यामुळे मद्यपींनी नाराजी व्यक्त केली.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. मात्र, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने झोननिहाय लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यात आली आहे. यामध्ये ग्रीन, ऑरेंज झोनमधील दुकाने सशर्त उघडण्याची परवानगी दिली आहे. तसेच तिन्ही झोनमधील दारूची दुकाने सुरू ठेवण्याला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे तळीरामांचा आनंद गगनाला भिडला होता. मात्र, फक्त पाच व्यक्ती एकावेळी दुकानांसमोर उभे राहू शकतात, असेही बजावण्यात आले आहे. असे असतानाही राजगुरुनगर येथे पाच पेक्षा अधिक लोक दारूच्या दुकानासमोर जमल होते. मात्र, दारूची दुकाने उघडली नाही. त्यामुळे राज्य सरकारने आमचा हिरमोड केल्याची खंत मद्यपींनी व्यक्त केली.