ETV Bharat / state

एनडीएच्या १३६ व्या तुकडीची पासिंग आऊट परेड संपन्न - हवाई कसरत

कडक आणि पांढऱ्या शुभ्र गणवेशातील कॅडेट्स, दमदार देहबोली, शिस्तबद्ध संचलन, सुखोई विमानांची सलामी आणि अखेर देशाच्या वायुदल प्रमुखांकडून मिळालेली शाबासकीची थाप, अशा उत्साहवर्धक वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा दीक्षांत समारंभ पार पडला.

एनडीएच्या १३६ व्या तुकडीची पासिंग आऊट परेड संपन्न
author img

By

Published : May 30, 2019, 3:17 PM IST

पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३६ व्या तुकडीतील उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सची गुरूवारी पासिंग आऊट परेड पार पडली. ही परेड खडकवासला येथील प्रबोधिनीच्या क्षेत्रपाल परेड ग्राउंडमध्ये घेण्यात आली.

एनडीएच्या १३६ व्या तुकडीची पासिंग आऊट परेड संपन्न

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३६ व्या तुकडीतील उत्तीर्ण झालेल्या २९१ कॅडेट्सना मंगळवारी आयोजित समारंभात पदवी प्रदान करण्यात आली होती. कडक आणि पांढऱ्या शुभ्र गणवेशातील कॅडेट्स, दमदार देहबोली, शिस्तबद्ध संचलन, सुखोई विमानांची सलामी आणि अखेर देशाच्या वायुदल प्रमुखांकडून मिळालेली शाबासकीची थाप, अशा उत्साहवर्धक वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा दीक्षांत समारंभ पार पडला.

त्यानंतर उत्तीर्ण झालेल्या तुकडीची पासिंग आऊट परेड पार पडली. यावेळी वायुदल प्रमुख बी. एस. धनोवा यांनी उत्तीर्ण केडरच्या पासिंग आऊट परेडचे निरीक्षण केले. या परेडच्या सुरुवातीला चित्ता हेलिकॉप्टर आणि सुखोई विमानांनी हवाई कसरती करून वायुदल प्रमुखांना सलामी दिली. त्यानंतर सारंग हेलिकॉप्टर्सनी चित्तथरारक कसरती करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी एनडीएतून उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सचे पालक, तीनही संरक्षण दलांचे वरिष्ठ अधिकारी आणि मित्र देशांचे सैन्याधिकारी उपस्थित होते.

Intro:पुणे - कडक आणि पांढऱ्या शुभ्र युनिफॉर्ममधील कॅट्स, दमदार देहबोली, शिस्तबद्ध संचलन, सुखोई विमानांची सलामी आणि अखेर देशाच्या वायुदल प्रमुखांकडून मिळालेली शाबासकीची थाप. अशा उत्साहवर्धक वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा दीक्षांत समारंभ पार पडला.

Body:राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 136 व्या तुकडीतील उत्तीर्ण झालेल्या 291 कॅडेट्सना मंगळवारी आयोजित समारंभात पदवी प्रदान करण्यात आली होती. त्यानंतर उत्तीर्ण झालेल्या तुकडीची पासिंग आऊट परेड गुरुवारी सकाळी खडकवासला येथील प्रबोधिनीच्या क्षेत्रपाल परेड ग्राउंडमध्ये पार पडली. यावेळी देशाचे वायुदल प्रमुख बी. एस. धनोवा यांनी उत्तीर्ण झालेल्या केडरच्या पासिंग आऊट परेड असे निरीक्षण केले.

पासिंग आऊट परेडच्या दरम्यान सुरुवातीला चित्ता हेलिकॉप्टर आणि सुखोई विमानांनी हवाई कसरती करून वायुदल प्रमुखांना सलामी दिली त्यानंतर सारंग हेलिकॉप्टर्सनी चित्तथरारक कसरती करुन उपस्थितांची मनं जिंकली.

यावेळी एनडीएतून उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सचे पालक, तीनही संरक्षण दलांचे वरिष्ठ अधिकारी आणि मित्र देशांचे सैन्याधिकारी ही उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.