ETV Bharat / state

मोफत ऑक्सिजन कॉन्सट्रेटर दोन आठवड्यात 15 रुग्णांना फायदा - पुणे ऑक्सिजन लेटेस्ट न्यूज

ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या कोरोना रुग्णांना लोकविश्व प्रतिष्ठानच्या वतीने वापरासाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मोफत दिल्या जात आहे. दोन आठवड्यात 15 रुग्णांना याचा फायदा झाला आहे.

कोरोना रुग्णांना वापरासाठी मोफत मिळतंय ऑक्सिजन काँसेंट्रेटर

author img

By

Published : May 24, 2021, 7:39 AM IST

मंचर (पुणे) : कोरोनामुळे ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या, मात्र ऑक्सिजन बेड मिळण्यास उशीर होत असलेल्या रुग्णांना मंचर येथील लोकविश्व प्रतिष्ठान व संतोष वायाळ मित्रपरिवाराच्या वतीने ऑक्सिजन बेड उपलब्ध होईपर्यंत, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन मोफत वापरासाठी देण्यात येत आहे. अशी माहिती लोकविश्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी दिली आहे.

कोरोना रुग्णांना मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

दोन आठवड्यात 15 रुग्णांना फायदा

कोरोनाचे गंभीर लक्षणे असणाऱ्या काही रुग्णांमध्ये ठराविक कालावधीनंतर शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी होण्यास सुरुवात होते. सद्यस्थितीत सर्वत्रच कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असल्याने ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळण्यास एक ते दोन दिवसांचा कालावधी लागत आहे. या कालावधीत ऑक्सिजन अभावी रुग्णाची परिस्थिती अति गंभीर होण्याची शक्यता वाढत आहे. याबाबीचा विचार करून लोकविश्व प्रतिष्ठान व संतोषभाऊ वायाळ मित्रपरिवाराने ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत मोफत ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम सुरू करून जेमतेम दोन आठवडे झाले असून, या दोन आठवड्यात ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील 15 रुग्णांना या उपक्रमांतर्गत ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मोफत वापरासाठी देण्यात आले असल्याचे सचिन तोडकर यांनी सांगितले.

5 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन दिले उपलब्ध करुन

या उपक्रमाचा फायदा खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील गरजू कोरोना रुग्णांना होत आहे. या उपक्रमासाठी युवा उद्योजक संतोष वायाळ यांनी लोकविश्व प्रतिष्ठानला 05 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन उपलब्ध करून दिले आहेत. नांदूर येथील श्रीराम मंदिरात संतोष वायाळ यांनी या मशीन लोकविश्वचे अध्यक्ष सचिन तोडकर यांच्याकडे सुपूर्त केल्या आहेत. यावेळी नांदूरचे सरपंच शेखर चिखले, पोलीस पाटील रवींद्र विश्वासराव, भावेश पुंगलिया, गोकुळ जव्हेरी आदी मान्यवर उपस्थित होते. आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या मात्र ऑक्सिजन बेड मिळण्यास विलंब होत असलेल्या कोरोनाच्या गरजू रुग्णांनी मोफत ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन मिळविण्यासाठी सचिन तोडकर यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन भावेश पुंगलिया यांनी केले आहे.

हेही वाचा - राज्यात सोमवारी 26 हजार 672 कोरोनाबाधितांची नोंद, 594 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.