खेड (पुणे) - जिल्हा प्रशासनाने सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर खेड प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी पुढाकार घेत आपल्या तालुक्यातील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयाचे बजाज कंपनीकडून मोफत ऑक्सिजन ऑडिट करून घेतले. तालुक्यातील 45 रुग्णालयाच्या ऑडिटमध्ये अनेक ठिकाणी गळती आढळून आली. या सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयातील ऑक्सिजनची गळती देखील बजाज कंपनीने मोफत दुरुस्त करुन दिली. यामुळेच एकट्या खेड तालुक्यात दिवसाला 180 गॅस सिलिंडरची बचत झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे.
खेड नंतर आंबेगाव, जुन्नर आणि बारामतील रुग्णालयाचे करणार ऑक्सिजन ऑडिट
जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातच ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे प्रशासनाला एक-एक टन ऑक्सिजन मिळविण्यासाठी सेकंदाला प्रयत्न आणि नियोजन करावे लागले. यामुळे शासनाद्वारे शंभर टक्के ऑक्सिजन आरोग्यासाठीच राखीव ठेवण्यात आला. त्यानंतर देखील ऑक्सिजनचा तुटवडा कमी झाला नाही. यामुळे पुण्यासाठी दुसऱ्या राज्यांतून ऑक्सिजन आणावे लागत आहे. हे सर्व सुरू असतानाच मिळणाऱ्या ऑक्सिजनचा अंत्यत काटकसरीने वापर करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सर्व खाजगी व सरकारी रुग्णालयाचे ऑक्सिजन ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ऑक्सिजन ऑडिट सुरू केले. तसेच खाजगी कंपन्यांकडून देखील ऑक्सिजन ऑडिट करून घेण्यात आले. यामध्ये खेड तालुक्यात बजाज कंपनीकडून सर्व रुग्णालयाचे ऑडिट करण्यात आले. आता खेड नंतर आंबेगाव, जुन्नर आणि बारामती तालुक्यातील रुग्णालयाचे बजाज कंपनीकडून ऑक्सिजन ऑडिट करण्यात येणार आहे.
ऑक्सिजन ऑडिटमुळे मोठी बचत
खेड तालुक्यातील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयाचे बजाज कंपनीच्या सहकार्याने मोफत ऑक्सिजन ऑडिट करून घेण्यात आले. त्यानंतर या ऑक्सिजन ऑडिटमध्ये सापडलेल्या त्रुटी देखील बाजाज कंपनीद्वारे स्वखर्चाने दूर करण्यात आल्या. यामुळेच एकट्या खेड तालुक्यात दिवसाला सुमारे 180 गॅस सिलेंडरची बचत झाली. आता बजाज कंपनीच अन्य तालुक्यात देखील ऑक्सिजन ऑडिट करून देणार आहे. अशी माहिती खेडचे प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे.
हेही वाचा - मुंबई : मागितले बील, रोखली रिवाल्वर; पार्वतीबाई चव्हाण हॉस्पिटलमधील प्रकार