पुणे - राज्यात विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान पार पडले आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक राजकीय उलथापालथ झालेली पाहायला मिळाली आहे. मेगाभरती व मेगागळतीने येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यामुळे पश्चिम महारष्ट्राकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - मराठवाडा विभाग : मतदार राजा कोणासोबत?
2014 ची आकडेवारी -
- काँग्रेस - 7
- राष्ट्रवादी - 16
- शिवसेना - 12
- भाजप - 19
- मनसे - १
- इतर - 3
- एकूण - 58
2014 ची राजकीय परिस्थिती -
2014 च्या आधी पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यानंतर झालेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट आली आणि राष्ट्रवादीचा गड आकडेवारीच्या नजरेतून भाजपने काबीज केला. शिवसेनेनेही चांगली कामगिरी करत 12 ठिकाणी विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादीचे 16 उमेदवार निवडूण आले होते.
हेही वाचा - दृष्टीहीन विद्यार्थिनींनी जल्लोषात साजरी केली दिवाळी
2019 ची राजकीय परिस्थिती -
सध्या आघाडीतील अनेक नेते, आमदार हे युतीत दाखल झाले आहेत. साताऱयात उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे साताऱयात काय निकाल लागतो याकडे राज्यासह दिल्लीचेही लक्ष लागले आहे. कोल्हापुरात धनंजय महाडिक हे देखील भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे मागील काही काळापासून झालेल्या मेगाभरतीमुळे पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - कुर्ल्यात पोलिसांवरील हल्ल्यामागे भाजपच्या स्थानिक नेत्यांचा हात - नवाब मलिक
लक्षवेधी लढत -
- सातारा - शिवेंद्रराजे भोसले Vs दिपक पवार
- कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) Vs अतुल भोसले (भाजप), उदय उंडाळकर पाटील (अपक्ष)
- कोथरुड - चंद्रकांत पाटील(भाजप) Vs किशोर शिंदे (मनसे)
- मावळ - बाळा भेगडे (भाजप) Vs सुनील शेळके (राष्ट्रवादी)
- इंदापूर - हर्षवर्धन पाटील (भाजप) Vs दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी)
- कागल - हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) Vs समरजीत घाटगे(अपक्ष)
- करमाळा - रश्मी बागल (शिवसेना) Vs संजय शिंदे (राष्ट्रवादी पुरस्कृत)
- सोलापूर दक्षिण - प्रणिती शिंदे (काँग्रेस) Vs दिलीप माने (शिवसेना)
दरम्यान, मतदान झाले असून आता 24 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. यात कोणाचा गुलाल उधळणार हे पाहणे महत्तवाचे असणार आहे.