ETV Bharat / state

गजब... वर्षभरात पुणेकरांवर 73 कोटींहून अधिक दंड; पाहा ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - पुण्यातील वाहतूक सक्ती

पुणे शहराला आता वाहतुकीचे शहर आणि वाहतूक कोंडीचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागल आहे. पुण्यात म्हणतात ना एकदा पुणेकरांनी जे ठरवल ते ठरवल असच काहीस पुण्यात हेल्मेट सक्ती बाबत आणि वाहतुकीच्या नियमांबाबत आहे.2005 पासून हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्या पुणेकरांवर यंदाच्या या जानेवारी 2022 पासून ते ऑक्टोबर 2022 पर्यंत एकूण तब्बल 13 लाख 33 हजार 829  वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्याचे चलन पुणेकरांच्या नावावर जमा आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Oct 29, 2022, 9:57 PM IST

पुणे - पुणे शहराला आता वाहतुकीचे शहर आणि वाहतूक कोंडीचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. पुण्यात म्हणतात ना एकदा पुणेकरांनी जे ठरवल ते ठरवलं. असेच काहीस पुण्यात हेल्मेट सक्ती बाबत आणि वाहतुकीच्या नियमांबाबत आहे. 2005 पासून हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्या पुणेकरांवर यंदाच्या या जानेवारी 2022 पासून ते ऑक्टोबर 2022 पर्यंत एकूण तब्बल 13 लाख 33 हजार 829 इतके वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्याने दंड जमा आहे. म्हणजेच एवढे ट्रॅफिकचे नियम पुणेकरांनी मोडले असून, याची एकूण रक्कम 73 कोटी 29 लाख 68 हजार 900 रुपये एवढी आहे.

ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट

2005 पासून जेव्हा जेव्हा शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. तेव्हा पुणेकरांनी याला विरोध केला. आता तर या वर्षभरात 73 कोटी 29 लाख 68 हजार 900 रुपये पैकी 20 कोटी 7 लाख 38 हजार 750 एवढे चलन फाईन पुणेकरांनी भरले असून. 53 कोटी 22 लाख 25 हजार 150 एवढे चलन भरणे पुणेकरांचे बाकी आहे.

वर्षभरात पुणेकरांवर 73 कोटींहून अधिक दंड

यामध्ये सगळ्यात जास्त विनाहेल्मेट वापर करणाऱ्यांचे जास्त चलन आहे. एकूण सात लाख 72 हजार 614 हा दंड विना हेल्मेटवाल्यांचा आहे. त्याची एकूण रक्कम 38 कोटी 59 लाख 56 हजार 500 एवढी आहे. त्याच्या खालोखाल नो पार्किंगमध्ये अनेक पुणेकरांनी वाहन उभे केल्यामुळे त्यांना तब्बल दोन लाख 3391 एवढ्या चलन केसेस समोर आल्या आहेत. त्यांची एकूण दहा कोटी 65 लाख 73हजार 500 एवढी भली मोठी फाईन अमाऊंट आहे. असेच, विविध वाहतुकीचे नियम पुणेकर तोडत असतात. यामध्ये झेब्रा क्रॉसिंग असू दे किंवा ट्रॅफिकचा सिग्नल मोडणे असू दे, विदाऊट लायसन फिरणे, विदाऊट सीटबेल्ट फिरणे अशा विविध नियमांचे उल्लंघन पुणेकर सर्रास करताना दिसून येत आहेत. आणि या सर्वांचा दंड रक्कम कोटीच्या घरामध्ये आहे.

हे आहेत टॉप सेव्हन महत्त्वाचे नियम सर्वाधिक मोडले जातात

1) विना हेल्मेट दुचाकी चालवणे
(चलन 772614)

2) नो पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करणे
(चलन 203391)

3)साईड मिरर नसणे
(चलन 84713)

4) झेब्रा क्रॉसिंगवर गाड्या उभा करणे
(चलन 58336)

5)सिग्नल मोडणे
(चलन 48789)

6)विदाऊट लायसन गाड्या चालवणे
(चलन 39931)

7)विदाऊट सिटबेल्ट गाड्या चालवणे
(चलन 35231)

पुणे शहरात 2005 सालापासून सर्वच राजकीय पक्षातील लोक एकत्र येत हेल्मेट विरोधी कृती समितीच्या माध्यमातून विरोध करत आहे. पण यात दुर्दैवी बाब अशी आहे की यात सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्देश आहेत. त्यामुळे हेल्मेट घातलच पाहिजे आणि ते केवळ पुढे बसलेल्या व्यक्तीने नव्हे तर दुचाकीवर बसलेल्या दोन्ही व्यक्तीने हेल्मेट घातलं पाहिजे. यात बदल केलं पाहिजे म्हणून आम्ही कृती समितीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत गेलो. जे जे सरकार आलं त्या त्या सरकार ला निवेदन देण्यात आली. पण हेल्मेट सक्ती रद्द झाली नाही का तर याबाबत न्यायालयाचे निर्देश आहे. अस असताना आम्ही मागणी केली की रस्त्यांवर पोलिसांकडून जी कारवाई होत आहे ती थांबवली गेली पाहिजे. आणि ती थांबवली गेली. पण ऑनलाईन स्वरूपात मोठ्या प्रमाणावर पुणेकरांना चलन येत आहे. आमची आत्ता फक्त एवढीच मागणी आहे की ज्या प्रमाणे कोविड काळातील गुन्हे रद्द करण्यात आले तस ऑनलाईन चलन देखील रद्द करण्यात यावं. अस यावेळी हेल्मेट कृती समितीचे सदस्य संदीप खर्डेकर यांनी म्हटले आहे.

पुणेकरांकडून सध्या फिल्डवर आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने वाहतुकीच्या नियमांवर लक्ष ठेवले जात आहे. यामध्ये ऑनलाईनमध्ये सर्वाधिक विना हेल्मेट गाडी चालवणे यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. पुणेकरांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असून आपल्या सुरक्षितेसाठीच वाहतुकीचे नियम बनवलेले असतात. त्यांचे पालन केले तर शहरातील वाहतूक देखील सुरळीत राहील आणि अपघात होणार मोठ्या प्रमाणात आळा बसेल. अस आवाहन पुण्याचे वाहातूक उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.