पुणे - शहरातील कोरेगाव पार्क परिसरात ओशो रजनीश यांचा ओशो आश्रम आहे. या आश्रमातील तीन एकर जागा आश्रम ट्रस्टींनी विकायला काढली आहे. या जागेच्या खरेदीसाठी तब्बल 107 बोली आली आहे. बजाज ग्रुपचे राजीव बजाज यांनी ही जागा 107 कोटींमध्ये खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे.
दोन भूखंडासाठी काढली निविदा -
ओशो रजनीश यांचे जगभरात अनुयायी आहेत. कोरेगाव पार्क येथील या एकूण 18 एकरच्या परिसरात हा ओशो रजनीश यांचा आश्रम आहे. याच ठिकाणी ओशो रजनीश यांची समाधीदेखील आहे. सध्या झुरिचमधील ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनकडे या आश्रमाची मालकी आहे. आता कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात आश्रम चालवण्यासाठी अडचणी येत असल्याने तसेच मोठा खर्च असल्याने हे दोन भूखंड विकण्यासाठी ट्रस्टींनी निविदा काढल्या होत्या. यात तीन बोली आल्या. त्यात राजीव बजाज यांची 107 कोटींची बोली सर्वाधिक होती. दरम्यान, ओशोंच्या अनुयायांनी या व्यवहाराला तीव्र विरोध केलेला आहे.
हेही वाचा - 'आई मला माफ कर, तुझी लाडकी...' पत्र लिहून वर्ग 1 महिला अधिकाऱ्याची आत्महत्या
हेही वाचा - धक्कादायक..! वडील आणि आजोबांची हत्या करून तरुणाची आत्महत्या