ETV Bharat / state

नाट्यगृह व चित्रपटगृह सुरु करण्याच्या मागणीसाठी कलाकरांकडून महाआरतीचे आयोजन

बालगंधर्व रंगमंदिर येथे महाआरतीच्या माध्यमातून सरकारने चित्रपटगृह आणि नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

महाआरतीचे आयोजन
महाआरतीचे आयोजन
author img

By

Published : Aug 31, 2021, 4:33 PM IST

Updated : Aug 31, 2021, 4:47 PM IST

पुणे - 1 सप्टेंबरपासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याचे आश्वासन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले होते. मात्र अद्यापपर्यंत सरकारकडून कोणत्याही प्रकाराचा निर्णय घेण्यात आला नाही. त्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) बालगंधर्व रंगमंदिर येथे महाआरतीच्या माध्यमातून सरकारने चित्रपटगृह आणि नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेते गिरीश ओक, अभिनेत्री सुरेखा कुडची, सुनील गोडबोले यांच्यासह अनेक कलाकार यावेळी सहभागी झाले होते.

नाट्यगृह व चित्रपटगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी महाआरती
आपल्या सर्व मागण्या पुर्ण होईपर्यंत रंगकर्मींच आंदोलन सुरुच राहणार आहे. आंदोलनाचा पुढचा प्रवास बालगंधर्व येथे नाटराजची पूजाकरून सुरु करण्यात आले. सरकारच्या आश्वासनावर रंगकर्मींचा विश्वास आहे, मंत्री महोदयांनी दिलेले आश्वासन पाळावे, अशी विनंती आंदोलकांनी केली आहे.

हेही वाचा - सरकार सणांच्या नाही, कोरोनाच्या विरोधात; मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना फटकारले

Last Updated : Aug 31, 2021, 4:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.