ETV Bharat / state

एमपीएससीच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आयोगाचे प्रयत्न; मराठा क्रांती मोर्चाचा विरोध - MPSC 2018 appointments cancellation

मराठा आरक्षणाबाबत आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वोच्च न्यायालयात 2018 पासून झालेल्या नियुक्त्या रद्द करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. या मागणी विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे.

Maratha morcha
मराठा मोर्चा
author img

By

Published : Jan 20, 2021, 3:35 PM IST

पुणे - मराठा आरक्षणाबाबत आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वोच्च न्यायालयात 2018 पासून झालेल्या नियुक्त्या रद्द करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. मुंबईत आझाद मैदानावर मराठा समाजातील मुले नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतल्याने मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे.

माहिती देताना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढेरे

हेही वाचा - पुण्यात भाजपचे नगरसेवक फुटणार? भाजप म्हणते ही तर फक्त अफवा

एमपीएससी कार्यालयात घुसण्याचा इशारा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय रद्द केला नाही, अथवा मागे घेतला नाही, तर मग मात्र आम्ही एमपीएससी कार्यालयात घुसणार, असा थेट इशारा देण्यात आला आहे. एमपीएससीने घेतलेल्या या निर्णयाविरोधात मराठा समाजातील विद्यार्थी रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढेरे यांनी व्यक्त केले.

दिल्लीत नेमकी कोणती फिल्डिंग लावली - कोंढरे

राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत किती गंभीर आहे, हे यावरून दिसून येते. दिल्लीत नेमकी कोणती फिल्डिंग लावली, असा सवाल कोंढरे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या निर्णयामुळे 2018 पासून नियुक्त्या रखडलेल्या 7 हजार विद्यार्थ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - हापूस आंब्याची पुण्यात दमदार एन्ट्री, पहिल्या पेटीला विक्रमी 25 हजारांचा भाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.