पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांना जाती पातीत आणि जन्मस्थळांमध्ये अडकवू नका, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा महाराष्ट्रातील शिवनेरी येथे झाला आहे, हे अवघ्या जगाला माहीत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज हे कर्नाटक येथील असल्याचे विधान हे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. ते, लोणावळा येथे शिवक्रांती कामगार संघटनेने आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, शिवक्रांती कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय पाळेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांना जाती-पातीत, जन्मस्थळांमध्ये अडकवू नका - प्रवीण दरेकर
कर्नाटक येथील मंत्र्यांनी केलेले वक्तव्य हे चुकीचे आहे. थोर पुरुषांना जाती पातीत, जन्मस्थळात अडकवून ठेवता कामा नये. छत्रपतींचा जन्म महाराष्ट्रातील शिवनेरी येथे झाला हे अख्ख्या जगाला माहीत आहे. मात्र, असे विधान करून थोर पुरुषांच्या बाबतीत वाद निर्माण करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.