पुणे - जुन्नर तालुक्यातील येडगाव येथील भोरवाडी येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास अंगावर वीज कोसळल्याने एका युवक शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महेश दशरथ भोर असे वीज पडुन मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
रात्री घराच्या बाजुला असणाऱया झोपडीत महेश झोपला असताना, पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट सुरु झाल्याने महेश झोपडीत घरात जात असताना त्याच्या अंगावर अचानक वीज कोसळल्याची घटना घडली आहे. त्याचा जागीच मृत्यु झाला आहे त्याच परिसरात मागील काही दिवसांपासुन तीन वेळा वीज पडण्याच्या घटना घडल्या आहे. सध्या आवकाळी पाऊसाचे वातावरण असताना वीज पडण्याचे प्रमाण खेड आंबेगाव जुन्नर शिरुर तालुक्यात वाढत चालले आहे. यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे.