पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊनच्या दहा दिवसानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होईल,असे सांगितले जात होते. परंतु, सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील चित्र उलट आहे. कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याच समोर आले आहे. शनिवारी दिवसभरात उच्चांकी रुग्ण संख्या वाढली असून 1 हजार 79 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 16 जणांचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला आहे. 571 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या 15 हजार 632 वर पोहचली आहे. पैकी, 10 हजार 158 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृतांचा आकडा देखील वाढत आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 563 आहे. लॉकडाऊननंतर बाधित रुग्णांची संख्या कमी होईल असे सांगितले जात होते. परंतु, गुरुवारी लॉकडाऊन संपले असून दोन दिवसानंतर दिवसभरातील रुग्ण संख्येने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शनिवारी मृत्यू झालेले रुग्ण पिंपळेगुरव (पुरुष ७० वर्षे), संत तुकाराम नगर पिंपरी (पुरुष ५६ वर्षे),पिंपरी (स्त्री ६४ वर्षे, पुरुष ८० वर्षे), चिंचवड ( पुरुष ३८ वर्षे, पुरुष ७४ वर्षे, पुरुष ९५ वर्षे), दापोडी (पुरुष ४५ वर्षे) नेहरुनगर (पुरुष ७५ वर्षे), च-होली (पुरुष ६७ वर्षे),मोहनगर (पुरुष ६७ वर्षे), म्हाळुंगे (पुरुष ३८ वर्षे), विश्रांतवाडी (स्त्री ७२ वर्षे), बालेवाडी (पुरुष ८५ वर्षे), मुळशी (पुरुष ६८ वर्षे), हिंजवडी (स्त्री ८४ वर्षे) येथील रहिवासी आहेत.