ETV Bharat / state

पुण्यात सराईत गुन्हेगाराची डोक्यात फरशी घालून हत्या - सराईत गुंड

काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर सुटून आलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीची डोक्यात फरशी घालून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Jan 10, 2020, 3:16 PM IST

पुणे - काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटून बाहेर आलेल्या सराईत गुंडाची डोक्यात फरशी घालून हत्या करण्यात आली. निलेश उर्फ गोट्या विठ्ठल शेंडगे (वय 22) असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे. हा प्रकार काल (दि. 9 जाने.) मध्यरात्री घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत निलेश शेडगे एका दरोड्याचा गुन्ह्यात तुरुंगात होता. पंधरा दिवसांपूर्वीच तो येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोडे वस्तीत त्याचे काही मुलांशी भांडण झाले. त्यानंतर तीन ते चार जणांनी त्याला मारहाण करत डोक्यात फरशी घालून त्याची हत्या केली.

हेही वाचा - आमदार अनिल भोसले, नगरसेविका रेश्मा भोसले यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान, हत्या झाल्याची माहिती मिळताच कोरेगाव पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ससून रुग्णालयात हलवला. त्यानंतर पोलिसांनी तपास करत दोघा संशयितांना ताब्यात घेतले. निलेशची हत्या का करण्यात आली, याचा अद्याप उलगडा झाला नाही. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा - उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार येणार बारामतीत; भव्य सत्काराचे आयोजन

Intro:पुण्यात सराईत गुन्हेगाराची डोक्यात फरशी घालून हत्या (use file photo)

काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटून बाहेर आलेल्या सराईत गुंडाची डोक्यात फरशी घालून हत्या करण्यात आली. निलेश उर्फ गोट्या विठ्ठल शेडगे (वय 22) असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे. हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत निलेश शेडगे एका दरोड्याचा गुन्ह्यात तुरुंगात होता. पंधरा दिवसांपूर्वीच तो येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. कोरेगाव पार्क पोलिसांच्या हद्दीतील दरोडे वस्तीत त्याचे काही मुलांशी भांडण झाले. त्यानंतर तीन ते चार जणांनी त्याला मारहाण करत डोक्यात फरशी घालून त्याची हत्या केली.

दरम्यान हत्या झाल्याची माहिती मिळताच कोरेगाव पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ससून रुग्णालयात हलवला. त्यानंतर पोलीसांनी तपास करीत दोघा संशयितांना ताब्यात घेतले. निलेशची हत्या का करण्यात आली याचा अद्याप उलगडा झाला नाही. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Body:...Conclusion:...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.