पुणे - गुरुवारी दिवसभरात शहरात 176 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. 157 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 महिला आणि 7 पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत पुण्यात एकूण 7 हजार 265 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी 4 हजार 505 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 2 हजार 399 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर 361 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सात हजारावर पोहोचला आहे. त्यात दररोज नवीन रुग्णांची भर पडत आहे. दाट झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत.