दौंड - दौंड तालुक्यातील पडवी हद्दीत स्कूल बस व खाजगी कार या दोन वाहनांचा अपघात झाला ( School Bus Accident Daund ) आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात स्कूल बस मधील एक विद्यार्थिनी जागीच ठार झाली आहे. पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक निरीक्षक केशव वाबळे यांनी ही माहिती दिली आहे.
पडवी - कुसेगाव अष्टविनायक रोडवर पडवी हद्दीत शनिवारी ( दि. 12) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान विद्यालयात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस व खाजगी कार वाहन यांच्यात समोर समोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये पाटस येथील अवनी गणेश ढसाळ ( वय ७ ) ही विद्यार्थिनी जागीच ठार झाली. तर आणखी एक मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.
या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस कर्मचारी घनश्याम चव्हाण, समीर भालेराव आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पाटस पोलीस पुढील तपास करीत आहे.
हेही वाचा - Jayant Patil On Central Investigation Agency : केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई संशयास्पद - जयंत पाटील