पुणे - जेजुरीला देवदर्शनासाठी चाललेल्या वाहनाचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगेश लक्ष्मण कासेकर (वय-४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. अपघात झालेले वाहन भरधाव वेगात पुण्याच्या दिशेने जात होते. चालकाचे वेगात असलेल्या वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठड्याला जाऊन आदळले. या अपघात मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन मंगेश यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबातील सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.
हेही वाचा - मंचर शहरातील खासगी रुग्णालयाविरुद्ध सरपंचचं बसले उपोषणाला
वाहनातील सर्व प्रवासी हे जेजुरीला देवदर्शनासाठी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या बाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.