ETV Bharat / state

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील एका महिलेला कोरोनाची लागण

बारामती तालुक्याच्या कोऱ्हाळे बुद्रक या गावातील एका वयोवृद्ध व्यक्तीला चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर नागरिकांचे स्वॅब तपासणीकरता पाठवण्यात आले होते. यामध्ये वृद्ध व्यक्तीच्या पत्नीचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील एका महिलेला कोरोनाची लागण
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील एका महिलेला कोरोनाची लागण
author img

By

Published : Jun 4, 2020, 7:37 PM IST

पुणे - जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील कोरोनाबाधित वृद्ध व्यक्तीच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आता बारामतीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा २० वर पोहोचला आहे.

चार दिवसांपूर्वी बारामती तालुक्याच्या कोऱ्हाळे बुद्रक येथील ९० वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील मुलगा, पत्नी, नातू या साऱ्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी मुलगा व नातू यांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर, आज(गुरुवार) त्यांच्या ७५ वर्षीय पत्नीचा मात्र अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोऱ्हाळेतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता २ वर आणि बारामती तालुक्यातील बाधितांचा आकडा २० वर पोहोचला आहे. ग्रामीण भागात पुन्हा नव्याने हे रुग्ण सापडल्याने ग्रामीण भागात चिंता व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.