ETV Bharat / state

बारामती : पिळदार शरीरयष्टीसाठी अवैधरित्या इंजेक्शन विकणारा गजाआड

author img

By

Published : Nov 9, 2021, 10:33 PM IST

ही औषधे डॉक्टरच्या सल्ल्याने घेतली जात नसून बारामतीमधील जिमला विकली जात होती. ही औषधे पोलीस व औषध निरीक्षक प्रशासनाने जप्त केली आहेत. आरोपी सातव यांच्याकडून २६८ रुपये प्रमाणे २० बॉटल्स किंमत अंदाजे ५, ३६० रुपये तसेच 9 लाख किंमतीची चारचाकी असा एकूण ९ लाख ३५, ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बारामती
बारामती

बारामती - झटपट पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी रक्त पुरवठा नियंत्रित करणारी इंजेक्शन अवैध पद्धतीने जिममध्ये विकणाऱ्यास बारामती पोलिसांनी गजाआड केले आहे. बारामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप सुरेश सातव (रा. कसबा, बारामती) या आरोपीस याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

शरीरावर दुष्परिणाम

सातव हा जिम करणाऱ्या लोकांना शरीर पिळदार होते. असे सांगून इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे सापळा रचून सातव यास त्याची चारचाकी गाडी (एम. एच. ०२ डी. झेड. ७२८६)सह पकडून त्याची व गाडीची झडती घेतली असता एकूण २० इंजेक्शन बॉटल मिळून आले आहेत. हे इंजेक्शन हे सर्जरी केल्यानंतर रक्तपुरवठा नियंत्रित करण्यासाठी व वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. परंतु त्याचा वापर जास्त शारीरिक परिश्रम केल्यानंतर सुस्ती न येण्यासाठी केला जातो. हे औषध हे शरीरावर दुष्परिणाम करणारे असल्याचे औषध निरीक्षक यांनी सांगितले आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतली जात होती

ही औषधे डॉक्टरच्या सल्ल्याने घेतली जात नसून बारामतीमधील जिमला विकली जात होती. ही औषधे पोलीस व औषध निरीक्षक प्रशासनाने जप्त केली आहेत. तरुण पिढीमध्ये पिळदार शरीरयष्टी बनवण्याचे वेड वाढलेले आहे. त्यासाठी काही ही करावयाची तरुणवर्गाची तयारी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सप्लिमेंट घेणे, काही इंजेक्शन घेणे यासारखे प्रकार केले जात आहेत. परंतु त्याचा दुष्परिणाम हा शरीरावर होत असतो. शरीराची खूप मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. मध्यंतरी काही बॉडीबिल्डरांचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचे लोन आता ग्रामीण भागात सुद्धा पसरत आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मुद्देमाल जप्त

आरोपी सातव यांच्याकडून २६८ रुपये प्रमाणे २० बॉटल्स किंमत अंदाजे ५, ३६० रुपये तसेच 9 लाख किंमतीची चारचाकी असा एकूण ९ लाख ३५, ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही औषधे कोठून आणली व अजून कोणाकोणाली दिली याचा तपास सहायक पोलीस निरक्षक गणेश पाटील करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.