ETV Bharat / state

Omkareshwar Temple in Pune : गुरू शिष्यांच्या दृढ नात्याचे प्रतीक ओंकारेश्वर मंदिर

पुण्यातील ओंकारेश्वर या प्राचीन ( Ancient Omkareshwar Temple in Pune ) मंदिराला पेशवेकालीन मोठा इतिहास आहे. या मंदिराला 285 वर्ष पूर्ण झाली आहेत. पुणे शहरातील ऐतिहासिक वारसा, प्रथम दर्जा कायदेशीर मान्यता असलेल्या या मंदिराबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Omkareshwar temple
Omkareshwar temple
author img

By

Published : Mar 1, 2022, 11:36 AM IST

पुणे : पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. हे पेशवेकालीन मंदिर असून याला मोठा इतिहास आहे. याबाबत मंदिराचे कार्यकारी विश्वस्त धनोत्तम लोणकर यांनी मंदिराची माहिती सांगितली आहे. ओंकारेश्वर मंदिर हे पुणे शहरातील ऐतिहासिक वारसा, प्रथम दर्जा कायदेशीर मान्यता असलेले मंदिर आहे. या मंदिराला 285 वर्ष पूर्ण ( Omkareshwar Temple completes 285 years ) झाली आहेत.

पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराची माहिती

पेशव्यांनी 1736 मध्ये या मंदिराची पायाभरणी ( Foundation stone of Omkareshwar temple ) केली. या मंदिराची निर्मिती पेशव्यांचे आध्यात्मिक गुरु शिवराम चित्रावत यांनी केली. एक लाख दहा हजार रुपये या मंदिराच्या बांधकामासाठी त्या काळात खर्च झाले, असे पेशव्यांच्या दप्तरामध्ये नमूद केले आहे. मंदिराचे सर्व बांधकाम चिमाजीआप्पा यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. चिमाजी आप्पांचे मंदिरावरती विशेष प्रेम होते. म्हणूनच मंदिराच्या परिसरामध्ये चिमाजी आप्पांची समाधी देखील आहे.

ओंकारेश्वर
ओंकारेश्वर

मुठा नदीच्या काठावर ( Omkareshwar temple on edge of Mutha ) प्रशस्त आवार असलेल्या या मंदिराला नऊ कळस आहेत. अन्य मंदिरांमध्ये कीर्तिमुख उंबरठ्यात असतो. मात्र, ओंकारेश्वर मंदिरामध्ये कीर्तिमुख कळसामध्ये आहे. महर्षी व्यास, दत्तगुरू, दोन सिंह आणि चार साधूंची शिल्पे कळसामध्ये आहेत. पानशेत पुरामध्ये मंदिरासमोरील नंदी आणि दीपमाळ पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. त्यानंतर आता हा नंदी नंतर पुन्हा आणून बसविण्यात आला.

ओंकारेश्वर मंदिर
ओंकारेश्वर मंदिर

ऐतिहासिक वार्ता प्रथमदर्शनी प्रथम श्रेणीतील -

Omkareshwar Temple
Omkareshwar Temple

1970 पर्यंत ओंकारेश्वर परिसरात स्मशान होते. अजूनही तेराव्याला दीपदान करून सुतक पूर्ण करण्याच्या प्रथेचे पालन केले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये महिलांना प्रवेश नाही. मात्र या वरती स्त्री पुरुष समानता राहावी. यासाठी चित्रावत शास्त्री यांच्या सातव्या वंशज आनंदीबाई लोणकर यांनी महिलांच्या हस्ते महाशिवरात्रीचा सर्वात मोठा उत्सव साजरा करण्याची परंपरा चाळीस वर्षांपूर्वी सुरु केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.