ETV Bharat / state

Om Birla : आपत्ती आणि संकटात मदत करणारा अगरवाल समाज - ओम बिर्ला - पुण्यात प्रांतिय महाअधिवेशन

चिकित्सा, विचार आणि मंथन हे अग्रवाल समाजाची विचारश्रेणी आहे. त्यातून समाजाने इथपर्यंत प्रयत्न केला . यापुढे सुद्धा भारत कसा महासत्ता होईल यासाठी अधिवेशनात मंथन करू आणि भारताच्या विकासासाठी आणि समाजासाठी अग्रवाल समाज काम करेल, असा विश्वास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज पुण्यात व्यक्त केला आहे. पुण्यामध्ये दोन दिवशी अग्रवाल समाजाचे अधिवेशन (convention of Agarwal Society) भरवण्यात आले होते. या अधिवेशनाचे उद्घाटन ओम बिर्ला (Om Birla Lok Sabha Speaker) यांच्या हस्ते करण्यात आले.

Om Birla
अधिवेशनाचे उद्घाटन करतांना ओम बिर्ला
author img

By

Published : Dec 24, 2022, 4:52 PM IST

प्रतिक्रिया देतांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

पुणे : अग्रवाल समाजाने ब्रिटिश काळामध्ये सुद्धा व्यापारी असताना स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. स्वातंत्र्य लढ्यात मदत केली. त्यामुळे हा आमच्या पूर्वजाने आणि अग्रसेन महाराजांनी दिलेला विचार आहे. जे काही करता येईल ते समाजासाठी करायचं. आम्ही शाळा उभ्या केल्या तर, त्यात सगळेच समाजाचे लोक शिक्षण घेतील. त्यामुळे आदर्श समाज म्हणून अगरवाल समाजाकडे बघितलं पाहिजे. हा समाज नेहमी देणारा आहे घेणारा नाही. त्यांना भारत महासत्ता करण्यासाठी, आता आपल्याला व्यापाराच्या, उद्योगाच्या, शाळेच्या, संस्थेच्या ज्या माध्यमातून अग्रवाल समाज कार्यरत आहे. त्या सर्व मार्गाने समाजाने प्रयत्न करावा, अशी अपेक्षा सुद्धा यावेळी ओम बिर्ला (Om Birla Lok Sabha Speaker) यांनी व्यक्त केली आहे.

जगभरात देशभरात कुठेही जा दहा कुटुंबाचे जरी घर असेल, तर तिथे अग्रसेन समाजाची धर्मशाळा, गोशाळा, शाळा, किंवा हॉस्पिटल असतं ही आमच्या समाजाची ओळख आहे आणि आपण जगाबरोबर बदलूया आणि देशाला पुढे नेऊया, असं आवाहन सुद्धा यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अग्रवाल समाजाला केलेला आहे.

पुणे (पुणे) ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी आहे. या ठिकाणी माणसं हे संस्कारक्षम होण्यासाठी येत असतात. त्यामुळे पुण्यातल्या पवित्र भूमीचे अधिवेशन होत आहे. ज्या ठिकाणी लोकमान्य टिळक, वीर सावरकर, रानडे यांची कर्मभूमी आहे. त्याच विचारावर आणि अग्रसेन महाराजांच्या सांगितलेल्या विचारावर, हा समाज इथे सुद्धा चांगलं काम करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

संकट आणि आपत्ती या दोन्ही काळात आपला व्यापार सोडून सढळ हाताने मदत करणारा हा अग्रवाल समाज आहे. त्यामुळे देशाच्या महासत्ता बनवण्यासाठी विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करूया, असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केलेला आहे. अग्रवाल समाजाच्या या अधिवेशनाला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार गजानन कीर्तिकर, अग्रवाल समाजातले सगळे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात महिला पुरुष देखील यावेळी उपस्थित होते. अखिल भारतीय अग्रवाल संम्मेलन तर्फे पुण्यात प्रांतिय महाअधिवेशन (two days) 24 ते 25 डिसेंबर (convention of Agarwal Society) दरम्यान अग्रोदय महाअधिवेशनचे आयोजन करण्यात आले. अधिवेशनचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.