ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये रस्त्यावर सांडले ऑईल; 50 वाहने घसरली

चिंचवड मोहन नगर ते वाकड भूमकर चौक इथपर्यंतच्या आठ किलोमीटर परिसरात ट्रकमधून ऑईल सांडल्याची घटना घडली आहे. यात एकूण 50 पेक्षा अधिक गाड्या घसरून अपघात झाला आहे.

oil-spilled-on-the-road-in-pimpri-chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये रस्त्यावर सांडले ऑईल; 50 वाहने घसरली
author img

By

Published : Jan 17, 2021, 8:04 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात मुख्य रस्त्याच्या आठ किलोमीटर परिसरात ट्रकमधून ऑईल सांडल्याची घटना घडली आहे. चिंचवड मोहन नगर ते वाकड भूमकर चौक इथपर्यंत हे ऑईल पसरले आहे. यात एकूण 50 पेक्षा अधिक गाड्या घसरून अपघात झाला आहे. यापैकी काही वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत.

ट्रकमधून सांडले ऑइल -

पहाटेच्या सुमारास अज्ञात ट्रकमधून ऑइल सांडले असल्याचे माहिती स्थानिकाने अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या चार गाड्यासह 15 कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रस्त्यावर ठिकठिकाणी ऑइल सांडले होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ या रस्त्यावर पाणी टाकून रस्ता साफ केला.

50 पेक्षा अधिक वाहनांचा अपघात -

दरम्यान, या ऑइलमुळे 50 पेक्षा अधिक वाहने घसरून पडली आहेत. यात दुचाकीस्वारांचा जास्त समावेश आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीविहितहानी झालेली नाही. परंतु, अनेक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले आहेत.

हेही वाचा - पुणे जिल्ह्यात सापडला 'बर्डफ्लू'चा विषाणू; पाच हजार कोंबड्याची विल्हेवाट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.