ETV Bharat / state

स्वच्छ शहर स्पर्धेतून पुणे बाहेर फेकले जाणार...'केंद्रीय पथकाकडून स्टार रेटींग नाही' - पुण्याला स्टार रेटिंग नाही

देशातील स्वच्छ शहरांमध्ये पहिला क्रमांक मिळविण्यासाठी दिवसरात्र एक केलेल्या पुणे महापालिका प्रशासनाला चांगलाच धक्‍का बसला आहे.

स्वच्छ शहर स्पर्धेतून पुणे बाहेर फेकले जाणार
author img

By

Published : Nov 6, 2019, 11:02 AM IST

पुणे - देशातील स्वच्छ शहरांमध्ये पहिला क्रमांक मिळविण्यासाठी दिवसरात्र एक केलेल्या पुणे महापालिका प्रशासनाला मोठा झटका बसला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत शहराचे स्टार रेटिंग जाहीर करण्यासाठी पालिकेस शहर हागणदारी मुक्‍त (ओडीएफ प्लस) असल्याचा दर्जा मिळविणे बंधनकारक होते. मात्र, या स्पर्धेत महापालिका नापास झाल्याने हे रेटिंग मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालिकेने या वर्षी 'ओडीएफ प्लस’ दर्जा मिळवण्यासाठी केंद्राकडे अर्ज केला होता. त्यामध्ये सुमारे 224 सर्वाधिक चांगल्या व अत्याधुनिक सुविधा असलेल्या स्वच्छता गृहाची तपासणी करण्यात आली. स्वच्छतागृहांत वेगवेगळे 53 निकष पूर्ण असणे आवश्‍यक होते. मात्र, अनेक ठिकाणी हे निकष पूर्ण न झाल्यामुळे पथकाने पालिकेस 'ओडीएफ प्लस’ दर्जा दिला नाही. परिणामी, महापालिकेस शहराचे स्टार रेटिंग करणे शक्‍य नाही. त्यामुळे पालिका आपोआपच स्वच्छ शहरांच्या स्पर्धेतून बाहेर पडणार आहे.

देशातील 2020 चे सर्वेक्षण संपण्यास अवघे दोन महिने शिल्लक आहेत. या स्पर्धेत राहण्यासाठी कालावधी असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं अधिकारी सांगत आहेत. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशातील शहरांच्या स्वच्छतेचे रॅकिंग ठरविण्यात येते.

या स्पर्धेत पहिले तीन वर्षे पहिल्या दहा शहरांमध्ये असलेल्या पुण्याचे 8 मानांकन 2019 मध्ये थेट 37 वर गेले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने 2020 साठी कंबर कसून जानेवारीपासूनच जय्यत तयारी केली होती. त्यात वेगवेगळ्या स्पर्धा, जनजागृती, अधिकाऱ्यांचा समावेश करून शहर स्वच्छतेवर भर देण्याचे उपक्रम पालिकेने हाती घेतले होते. मात्र पालिकेस 'ओडीएफ प्लस’ दर्जा मिळाल्यामुळे स्वच्छ शहर स्पर्धेतून पुणे बाहेर फेकले जाणार आहे.

Intro:स्वच्छ शहर स्पर्धेतून पुणे बाहेर फेकले जाणार....Body:mh_pun_01_pmc_out_se wacha_abhiyan_av_7201348

anchor
देशातील स्वच्छ शहरांमध्ये पहिला क्रमांक मिळविण्यासाठी दिवसरात्र एक केलेल्या पुणे महापालिका प्रशासनाला चांगलाच धक्‍का बसला आहे.स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत शहराचे स्टार रेटिंग जाहीर करण्यासाठी पालिकेस शहर हागणदारी मुक्‍त (ओडीएफ प्लस) असल्याचा दर्जा मिळविणे बंधनकारक होते.मात्र, या स्पर्धेत महापालिका नापास झाल्याने हे रेटिंग मिळणार नसल्याचे समोर आले आहे. देशातील 2020 चे
सर्वेक्षण संपण्यास अवघे दोन महिने शिल्लक असतानाच पालिका या स्पर्धेतून बाहेर फेकली जाणार आहे.स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशातील शहरांच्या स्वच्छतेचे रॅकिंग ठरविण्यात येते.या स्पर्धेत पहिले तीन वर्षे पहिल्या दहा शहरांमध्ये असलेल्या पुण्याचे 8 मानांकन 2019 मध्ये थेट 37 वर गेले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने 2020 साठी कंबर कसत जानेवारीपासूनच जय्यत तयारी केली होती.त्यात वेगवेगळ्या स्पर्धा, जनजागृती, अधिकाऱ्यांचा समावेश करून शहर स्वच्छतेवर भर देण्याचे उपक्रम पालिकेने हाती घेतले होते.अजूनही आपल्याला या स्पर्धेत राहण्यासाठी कालावधी आहे त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं अधिकारी सांगतायेत. मात्र या स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्यास शहराचे स्टार रेटिंग आवश्‍यक आहे.त्यासाठी शहर हगणदारी मुक्त बंधनकारक असून त्यातही “ओडीएफ प्लस’, “ओडीएफ प्लस प्लस’ असा दर्जा असणे आवश्‍यक आहे. त्या अंतर्गत पालिकेने या वर्षी “ओडीएफ प्लस’ दर्जासाठी केंद्राकडे अर्ज केला होता.त्या अंतर्गत सुमारे ,224 सर्वाधिक चांगल्या व अत्याधुनिक सुविधा असलेल्या स्वच्छता गृहाची तपासणी करण्यात आली. स्वच्छतागृहांत वेगवेगळे 53 निकष पूर्ण असणे आवश्‍यक होते. मात्र, अनेक ठिकाणी हे निकष पूर्ण न झाल्याने या पथकाने पालिकेस “ओडीएफ प्लस’ दर्जा दिला नाही. परिणामी, महापालिकेस शहराचे स्टार रेटिंग करणे शक्‍य नाही.त्यामुळे पालिका आपोआपच स्वच्छ शहरांच्या स्पर्धेतून बाहेर पडणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.