पुणे - ज्यांना जग काय आहे हेही माहित नाही. ज्यांचे आयुष्य केवळ स्वतःपुरते सीमित आहे. अशा विशेष मुलांच्या 'बेरंगी दुनियेत भरू या, आनंदाचे रंग' या उपक्रमांतर्गत माजी उपमहापौर आबा बागुल ( Former Deputy Mayor Aba Bagul ) मित्रपरिवारातर्फे २५० विशेष मुलांना चित्रकलेचे साहित्य भेट ( Gift of painting materials to children ) देण्यात आले.
चित्रकलेचे साहित्य भेट - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ( Prime Minister Pandit Jawaharlal Nehru ) यांच्या जयंतीनिमित्त कामायनी संस्थेतील २५० विशेष मुलांना चित्रकलेचे साहित्य भेट ( Gift of painting materials ) देऊन बालदिन ( Children Day ) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे युवा नेते अमित बागुल, कामायनी संस्थेचे व्यवस्थापक कालिदास सुपाते, आदी उपस्थित होते.

वंचित घटकांमधील मुलामुलींसमवेत बालदिन साजरा - दरवर्षी आम्ही समाजातील वंचित घटकांमधील मुलामुलींसमवेत बालदिन साजरा करत असतो.विशेष करून ज्यांचे आयुष्य केवळ स्वतःपुरते सीमित आहे. अशा विशेष मुलांकडे समाजाने लक्ष द्यावे या हेतूने विविध उपक्रम राबविले जातात मात्र त्यातून ही मुलेही समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल करून घेऊ या,तेही 'आपल्यातीलच एक' आहेत याची जाणीव म्हणा संदेश देण्याचा आमचा उद्देश नेहमी असतो.अस यावेळी अमित बागुल म्हणाले.