पुणे - शहर पोलिसांनी १ जानेवारीपासून पुणे शहरात दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मेट सक्ती लागू केली होती. यानंतर विविध राजकीय आणि रामाजिक संघटनांनी सरकारच्या निर्णयाचा मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. मात्र, आता हेल्मेट सक्तीमुळे २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये अपघातांची संख्या २५ टक्क्यांनी घटल्याचे दिसत आहे.
पोलिसांनी 1 जानेवारी 2019 पासून पुणे शहरात दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मेट सक्ती लागू केली होती. यानंतर विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचा मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. मात्र, पुणे वाहतूक पोलिसांनी हेल्मेट वापरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली होती. पोलिसांनी यामुळे वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात जनजागृती अभियानही राबवले होते. यामुळे 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये अपघातांची संख्या घटली आहे. त्यामुळे हेल्मेट सक्तीला राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून विरोध झाला असला, तरी सर्वसामान्य पुणेकरांकडून हेल्मेट सक्तीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सिद्ध झाले आहे.