पुणे- कुख्यात रावण टोळीच्या सदस्याला खंडणी दरोडा विरोधी पथकाने पिस्तुल आणि दोन जिवंत काडतूसासह अटक केली आहे. कुणाल चंद्रसेन गायकवाड( वय-22, रा. अजिंठानगर चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथकातील कर्मचारी पोलीस नाईक निशांत काळे व आशिष बोटके यांना वाल्हेकरवाडी रोड, रावेत येथे सराईत रावण टोळीचा सदस्य मित्राला भेटण्यासाठी येणार आहे त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार परिसरात सापळा रचत पोलिसांनी कुणाल गायकवाड याला ताब्यात घेतले
त्यानंतर अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. ज्याची बाजारात किंमत 30 हजार 400 रुपये आहे. पोलिसांनी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त करत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्यावर निगडी पोलिसात एक गुन्हा दाखल आहे.