ETV Bharat / state

Nitin Gadkari On Palkhi Marg : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पालखी मार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा - Nitin Gadkari On Palkhi Marg

राज्यात पालखी मार्गाचे काम सुरू आहे. देहू, पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हवाई पाहणी केली. त्यांच्यासोबत आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरही उपस्थित होते.

Nitin Gadkari On Palkhi Marg
Nitin Gadkari On Palkhi Marg
author img

By

Published : Mar 11, 2023, 5:43 PM IST

Updated : Mar 11, 2023, 5:55 PM IST

पालखी मार्गबाबच नितीन गडकरींची मोठी घोषणा

पुणे : राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर राज्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहेत. अशातच काही घोषणा झाली तर, त्यावर देखील मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. सध्या राज्यात पालखी मार्गाचे काम सुरू आहे. पुण्यातील वाहतुकीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, फक्त घोषणा होत असून शहरातील ट्रॅफिकचा विषय ज्वलंत बनत आहे.

मी घोषणा करणाऱ्यांपैकी नाही : यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मी घोषणा करणाऱ्यांपैकी नाही. कोणती घोषणा केली, ती पूर्ण झाली नाही ती सांगा. मी असे करतच नसल्याचे यावेळी गडकरी यांनी सांगितले. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यांनी देहू, पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी केली आहे. त्यांच्याबरोबर आज खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे देखील उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पालखी मार्गाची पाहणी : पालखी मार्ग माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अया पालखी मार्गाची आज मी पाहणी केली आहे. या पालखी मार्गाच्या कामात अनेक अडचणी आल्या आहेत. पण त्या दूर करून सध्या मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. या मार्गावर वारकऱ्यांच्या दुष्ट्रिने सर्वच उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या मार्गाचे 85 टक्के काम हे पूर्ण झाले आहे. येत्या वर्षभरात सर्वच कामे पूर्ण होणार असून नवीन वर्षात दोन्ही पालखी मार्ग हे सुरू होणार असल्याचे यावेळी गडकरी यांनी सांगितले.

मार्गावर एकूण ११ पालखी स्थळे : हा पालखी मार्ग 130 किमी लांबीचा महामार्ग असून यात पुणे जिल्ह्यातील पाटस, बारामती, इंदापूर, अकलुज, बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण ११ पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि सुविधांसह सौंदर्यीकरण देखील करण्यात येणार आहे. यामुळे या मार्गाच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

पालखी मार्गावर वृक्षांची लागवड : पालखी मार्गावर दोन्ही बाजूंनी विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरींनी दिली आहे. यात असून चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सध्या या मार्गावरील रस्त्याच्या मध्यात 57 हजार 200, रस्त्याच्या दोन्ही बाजूस मिळून 18 हजार 840 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सध्या पुण्यातील बहुचर्चित अशा चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे काम सुरू असून याचे काम कधी पर्यंत पूर्ण होणार आहे. याबाबत गडकरी यांना विचारले असता ते म्हणाले की, चांदणी चौकातील काम हे 1 मे पर्यंत पूर्ण होणार आहे. जर राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना वेळ मिळाला, तर त्याच दिवशी याचे उद्घाटन होईल असे देखील यावेळी गडकरी म्हणाले.

पालखी मार्गावर टोल : नवीन पालखी मार्गावर टोल असणार आहे असे देखील यावेळी गडकरी यांनी सांगितले. तसेच आज हवाई दौरा करत असताना यावेळी उजनी धरणाचीही पाहणी केली. पालखी मार्गासाठी मोठ्या प्रमाणात रेतीची गरज आहे. सध्या उन्हाळ्यात धरणातील पाण्याची पातळी ही कमी होत असते. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहे. धरणातील गाळ काढले तर, नसर्गिक पातळी देखील वाढेल. पाण्याची क्षमता देखील वाढणार आहे. रस्त्याला लागणाऱ्या रेतीच प्रश्न देखील सुटणार आहे. याबाबत मी लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार आहे, असे देखील यावेळी गडकरी म्हणाले.

हेही वाचा - MNS Vice President Resignation : राज ठाकरेंना मोठ धक्का; नवी मुंबई उपाध्यक्षासह 5 वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Last Updated : Mar 11, 2023, 5:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.