ETV Bharat / state

Nirmala Sitharaman Visit Baramati : मी पक्ष बांधणीसाठी बारामतीत आले, पवार परिवारासाठी नाही : अर्थमंत्री निर्मला सीतारामन - Finance Minister Nirmala Sitharaman

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या बारातमती दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी बारामती मतदारसंघाविषयी चर्चा केली. "मी येथे पक्षबांधणीसाठी आली आहे. कोणालाही टार्गेट करायला मी आलेली नाही. कोणत्या एका परिवारासाठी मी आलेली नाही. तसेच ईडी कारवाईमध्ये आम्ही लुडबुड करीत नाही", असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

Nirmala Sitharaman Visit Baramati
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती दौरा
author img

By

Published : Sep 23, 2022, 9:18 AM IST

Updated : Sep 23, 2022, 10:48 AM IST

पुणे : ईडी कारवाईमध्ये आम्ही लुडबुड करीत नाही, ईडी अशी कुठेही पोहचत नाही. ईडीला मनी लाॅन्ड्रींग असेल किंवा काही संशय असेल, तर अशा केसमध्ये ईडी येते असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ( Nirmala Sitharaman Visit Baramati ) आज पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौऱ्यावर आहेत. पवारांना टार्गेट करण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे, असे बोलले जाते.

निर्मला सीतारण बारामती दौऱ्यावर

कुण्या एका परिवारासाठी मी बारामतीत आलेली नाही : त्यालासुद्धा त्यांनी आज उत्तर दिले असून, आम्ही पक्ष मजबूत करण्यासाठी आलेलो आहे. कुण्या एका परिवारासाठी मी बारामतीत आलेली नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, बारामतीमधील जनतेला भाषा समजवण्याची गरज नाही. साऊथ सिनेमा समजतो, आपण वेस्ट बांगला इकडून तिकडून नेते येतात, त्यांची भाषा समजते. तर बारामतीमध्ये माझी भाषा लोक समजतात. त्यामुळे चिंता नाही, असे म्हणत त्याने बारामतीकरांना आपण बोलत असल्याचे समजत असल्याचे सांगितले आहे.

भाजप संघटना मजबूत करायला आली : देशभरामध्ये सगळीकडे आम्ही लक्ष घातले आहे, फक्त बारामती नाही. मी बारामतीत भाजप संघटना मजबूत करायला आली आहे. कोणी एका परिवारासाठी आली नाही, असे म्हणत त्याने पवार कुटुंबीयांना टार्गेट करण्यासाठी नाही तर आम्ही आमचा पक्ष येथे मजबूत करण्यासाठी आलो असल्याचे म्हटले आहे.

मी बारामतीला टार्गेट करायला आली नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी आरएसएसचे काम करीत होते. आम्ही जरूर आरएसएसपासून प्रेरणा घेतो आज पण शेतकऱ्यांना त्यांच्या व्याज देण्यात पीक योजना मिळत आहे. आज पण शेतकऱ्यांना त्याच व्याजदरात पीकयोजना मिळत आहे. मी परत सांगतेय बारामतीला भाजप संघटना मजबूत करायला आली आहे. मी बारामतीला टार्गेट करायला आली नाही हे लक्षात ठेवा.

वाढत्या महागाईबाबत लोकसभेत प्रत्येक वेळी उत्तर दिले आहे. खाण्याचा तेल आयात होते, अतिवृष्टीमुळे महागाई झाली. टोमॅटो जास्त होणे किंवा कमी होणे, यामुळे महागाई झाली असेल. अमेरिका, तुर्कीमध्ये पण महागाई वाढली आणि परस्थिती काय आहे पाहत आहात. आमचे नेते म्हणतात तर आले असेल आम्ही प्रत्येक मतदारसंघात प्रयत्न तर करणार आहोत. त्यामुळे आमचे स्थानिक नेते म्हटले असतील माझ्या येण्याने बारामती मतदारसंघात बदल होणार असेल तर माहिती नाही. पण, मी संघटना मजबूत करायला आली आहे

वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर वेदांताबद्दल जे टीका करताहेत ते तीन-चार महिन्यांपूर्वी सत्तेत होते. त्यावेळी त्यांनी बुलेट ट्रेन रिफायनरी नानार प्रकल्प हे सगळे थांबवणार रे आता बोलत आहेत. मुंबईत आहेत अडचणी येत आहेत. त्यात मुंबईचे मोठे नुकसान आहे की तोटा यात गुजरातचा फायदा आहे. मुंबई फायद्यासाठी आलेले उद्योग थांबवणारे हेच आहेत ना, विरोधक महाराष्ट्रातील पाच प्रकल्प गेले हे सगळे मगरमच्छ के आंसू क्यू दिखा रहे हैं, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवरसुद्धा मोठा निशाणा साधला.

वेदांताच राजकारण चालू आहे, हे सगळे समजू शकतो. पण, आम्ही विकासाचे आणि देशाच्या प्रगतीचे राजकारण करून एक चांगला देश घडवू असेही यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. याच कार्यक्रमात त्यांच्या हस्ते केंद्राच्या विविध योजनांचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र त्यांच्या हस्ते देण्यात आलं तसेच ज्या वस्तू दिल्यात त्याचे पूजन ही निर्मला सीतारमन यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे.

Last Updated : Sep 23, 2022, 10:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.