पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक आणि इर्टीगा कारचा भीषण अपघात होऊन 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात आज पहाटे 1 वाजताच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील कदम वाकवस्ती येथील ग्रामपंचायती समोर झाला. मृतांमध्ये महाविद्यालयीन तरुणांचा समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुण हे पुणे जिल्ह्यातील यवत येथील रहिवासी आहेत. हे सर्वजण इर्टीगा गाडीतून पावसाळी पर्यटनासाठी रायगड येथे गेले होते. तेथून परत येत असतान हा अपघात झाला. इर्टीगा गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याचा दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकवर धडकली. यात कारमधील सर्वच्या सर्व नऊ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुणे-सोलापूर रस्त्यावर तब्बल 2 किमीपर्यंत रांगा लागल्या आहेत.
अपघातील मृतांची नावे
अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव, आणि जुबेर अजिज मुलांनी मृत तरुणांची नावे आहेत.