पुणे : आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटीमध्ये छापेमारी एनआयए आणि आयबीने छापेमारी केली आहे. या छापेमारीमध्ये एकाला अटक केली आहे.
जुबेर शेख (वय ३९ वर्ष) यास चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा व आयबी यांनी संयुक्तरित्या छापा मारून ताब्यात घेतले आहे. यावेळी कोंढवा पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक संजय मोगले (गुन्हे), गोपनीय अंमलदार, तपास पथक स्टाफ, महिला पोलीस अंमलदार हजर होतो. ही कारवाई शांततेत पार पाडलेली आहे.
संयुक्तरित्या छापा मारून अटक केली : आज रोजी सकाळी 04 वाजून 05 मिनिटांनी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटी, नुरणी कब्रस्तान जवळ, चौथा मजला, फ्लॅट नं. 42 ए विंग कोंढवा पुणे येथे जुबेर शेख (वय 39 वर्ष धंदा नोकरी) यास चौकशी कमी राष्ट्रीय तपास यंत्रणा व इंटेलिजेन्स ब्यूरो टीम यांनी संयुक्तरित्या छापा मारून ताब्यात घेतले. तसेच काही महत्वाचे कागदपत्र पुढील तपासकरिता ताब्यात घेण्यात आले. कारवाईच्या वेळी घटनास्थळी पंचनामा करण्यात आलेला आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
मार्च महिन्यात नागपूरमध्ये कारवाई : मार्चमध्ये नॅशनल इन्वेस्टींगेशन एजन्सी पथकाने नागपुरात सर्च ऑपरेशन राबविले होते. दोन ठिकाणी छापेकरी करत तिघांची चौकशी करण्यात आल्याची माहिती पुढे येत होती. माहितीनुसार नागपुरच्या सतरंजीपुरा भागात राहणाऱ्या तिघांनी पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनांशी संवाद साधला होता. ते 2017 पासून या गटाच्या संपर्कात होते. 'एनआयए' पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी भल्या पहाटे कारवाई केली होती. विशेष म्हणजे, आज एनआयएकडून देशभरात अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्याची माहिती मिळाली होती.
हेही वाचा :
- Ghazwa E Hind : एनआयएच्या रडारवर 'गजवा ए हिंद'चे स्लीपर सेल, नेमकी ही दहशतवादी संघटना कशी निर्माण झाली?
- NIA Raids In Nagpur : 'या' प्रकरणांसंबंधी नागपुरात एनआयएची छापेमारी, देशभरात कारवाई
- NIA Raid PFI Maharashtra : दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी पीएफआय विरुद्ध विविध राज्यात छापेमारी; 106 जणांना अटक