ETV Bharat / state

चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर पुढील 14 दिवस का महत्त्वाचे? - Astronomer Lena Bokiel

चंद्रयान 3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लॅंडिंग केल्यानंतर पुढील १४ दिवस फार महत्वाचे असल्याची प्रतिक्रिया खगोल शास्त्रज्ञ लीना बोकील यांनी दिली आहे. दक्षिण ध्रुवाजवळ कायम अंधार असतो. सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर यान 14 दिवस काम करेल असे त्या म्हणाल्या.

Chandrayaan 3
Chandrayaan 3
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 10:15 PM IST

Updated : Aug 23, 2023, 10:47 PM IST

लीना बोकील यांची प्रतिक्रिया

पुणे : सुमारे 41 दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर चंद्रयान 3 ने आज संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केलं. इस्रोच्या चंद्रयान 3 ने दक्षिण ध्रुवाजवळ उतरण्याचा जगात नवा इतिहास रचला आहे. भारत हा जगातील असा पहिला देश ठरला आहे. चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगनंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. यावर खगोल शास्त्रज्ञ लीना बोकील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रयान 3 ऐतिहासिक क्षण : चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर पुढील 14 दिवस खूप महत्त्वाचे आहेत, असे मत लीना बोकील यांनी व्यक्त केले आहे. हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी ऐतिहासिक क्षण आहे. चंद्रयान ३ च्या लँडिंगनंतर काही मिनिटांत, तेथे उडालेली धूळ, माती स्थिरावेल. त्यानंतर प्रज्ञान रोव्हर खाली येईल अशी माहिती बोकील यांनी दिली आहे. प्रज्ञान रोव्हर तेथे झटपट किंवा ऑन-द-स्पॉट प्रयोग करेल. तसेच, तेथून नमुने घेऊन प्रयोगशाळेत विश्लेषण केले जाईल असे देखील बोकील म्हणाल्या.

संशोधनासाठी दिशा दर्शक : पुढे बोलताना बोकील म्हणाल्या की, चंद्रयान 3 साठी पुढील 14 दिवस फार महत्त्वाचे आहेत. आता सूर्यकिरण दक्षिण ध्रुवावर पोहोचायला लागले आहेत. म्हणजे तिथे दिवस उगवला आहे. मात्र असे असतानाही दक्षिण ध्रुवाजवळ कायम अंधार असतो. थोडासा सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे हे यान 14 दिवस काम करेल. त्यानंतर तिथले काम झाल्यानंतर रिझल्ट पृथ्वीपर्यंत येतील. मागच्या वेळेला काही गोष्टी चुकल्या होत्या. त्यात दुरुस्ती करून विक्रम लँडर दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचलेले आहे. हे अभियान देशासह जगातील संशोधनासाठी दिशा दर्शक ठरेल असा विश्वास बोकील यांनी व्यक्त केला आहे.

रशियाचे लुना 25 यान चंद्रावर क्रॅश : चंद्रयान 3 ने 14 जुलै 2023 रोजी आंध्रप्रदेशमधील श्रीकोटा येथून उड्डाण केले होते. 41 दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर चंद्रयान 3 ने चंद्रावर स्पॉट लॅंडींग केले आहे. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा सहापट कमी असल्याने चंद्रावर यान उतरवणे प्रमुख्य समस्या होती. मात्र, त्यावर मात करत चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करण्यात चंद्रयान 3 यशस्वी झाले आहे. मात्र, 20 ऑगस्ट रोजी, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या प्रयत्नात रशियाचे लुना 25 यान चंद्रावर क्रॅश झाले होते.

हेही वाचा -

  1. भारताची 'चंद्रक्रांती'! Chandrayaan 3 चे चंद्रावर यशस्वी लॅंडिग
  2. 'नव्या भारताचे नवे उड्डाण', चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर पंतप्रधान मोदींनी केले देशाचे अभिनंदन
  3. Chandrayaan 3 Landing: भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठा दिवस; चंद्रयान करणार चंद्रावर लँडिंग

Last Updated : Aug 23, 2023, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.