पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी दिवसभरात २६ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यात शहराबाहेरील चार रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या ४४६ वर पोहोचली आहे. तसेच २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत १९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा ओसरला असून दिवसभरात २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात शहराबाहेरील रुग्णांचा समावेश असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे. बाधित रुग्णांची संख्या ४४६ वर पोहोचली असून आत्तापर्यंत शहरातील १९१ जणांना तर शहराबाहेरील २० जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
बुधवारी बाधित आढळलेले रुग्ण हे चऱहोली, भाटनगर, किवळे, निगडी, पिंपळे गुरव, सांगवी आनंदनगर चिंचवड, बौध्दनगर, काळेवाडी फाटा, बोपखेल, आंबेगांव येथील रहिवासी आहेत. तर डिस्चार्ज देण्यात आलेले करोनामुक्त हे किवळे, संभाजीनगर, रुपीनगर, आनंदनगर चिंचवड, रहाटणी, चिखली, कसबापेठ, बोपोडी येथील रहिवासी आहेत.