ETV Bharat / state

पुण्यामध्ये संततधार : मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ पथक तैनात - पावसाची नोंद

5 ऑगस्टला देखील अशा प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी महत्वाचे काम असेल, तरच बाहेर पडावे असे, आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे
author img

By

Published : Aug 4, 2019, 8:44 PM IST

पुणे - संततधार पडणाऱ्या पावसाने पुण्यात जुलैमधील गेल्या दहा वर्षांतील 'रेकॉर्ड' मोडले आहेत. त्यामुळे पावसाची परिस्थिती बघता एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे

पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच 5 ऑगस्ट रोजी देखील अशा प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी महत्वाचे काम असेल, तरच बाहेर पडावे असे, आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भामा आसखेड धरण परिसरात अतिवृष्टी सुरू असून, गेल्या 24 तासात सरासरी 170 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे भामा आसखेड धरणातून 20 हजार 527 क्युसेक विसर्ग वाढवण्यात आला आहे. तर खडकवासला धरणातून एकूण 41 हजार 756 क्युसेक इतका विसर्ग मुठा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

चासकमान धरण परिसरात व भिमाशंकर भागात अतिवृष्टी सुरू असून, गेल्या 24 तासात 300 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे चासकमान धरणातून 50 हजार 120 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. तसेच ब्रिटिश कालीन भाटघर धरण देखील 100 टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.

तर पुण्यातील अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलिसांनी बोटीच्या मदतीने पुण्याच्या सांगवीमधील मधुबन सोसायटी भागातून 15 परदेशी नागरिक, 1 गर्भवती महिला, 1 मुलीला सुरक्षित स्थळी हलवले आहे. त्याप्रमाणेच आतापर्यंत शहराच्या विविध भागातील 625 कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

Intro:पुणे - संततधार पडणाऱ्या पावसाने पुण्यात जुलैमधील गेल्या दहा वर्षांतील "रेकॉर्ड' मोडले आहेत. त्यामुळे पावसाची परिस्थिती बघता एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.Body:पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भामा आसखेड धरण परिसरात अतिवृष्टी चालू असून, गेल्या 24 तासात सरासरी 170 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे भामा आसखेड धरणातून 20527 क्युसेक्स विसर्ग वाढवण्यात आला आहे. तर खडकवासला धरणातून एकूण 41756 क्युसेक्स इतका विसर्ग मुठा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

चासकमान धरण परिसरात व भिमाशंकर भागात अतिवृष्टी चालू असून, गेल्या २४ तासात ३०० मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे चासकमान धरणातून ५०१२० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. तसेच ब्रिटिश कालीन भाटघर धरण देखील शंभर टक्के भरले आहे. धरणाचे सगळे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

त्याप्रमाणेच अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलिसांनी बोटीच्या मदतीने पुण्याच्या सांगवी मधील मधुबन सोसायटी भागातून 15 परदेशी नागरीक,1 गर्भवती महिला,1 विशेष मुलीला सुरक्षित स्थळी हलवले आहे. त्याप्रमाणेच आतापर्यंत शहराच्या विविध भागातील ६२५ कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच 5 ऑगस्ट रोजी देखील अशा प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी महत्वाचे काम असेल, तरच बाहेर पडावे असे, आवाहन देखील नवल किशोर राम यांनी केले आहे.

Byte Sent on Mojo
Byte Naval Kishor RamConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.