पुणे - राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची बारामतीतील 'गोविंद बाग' या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत फलटणचे आमदार दीपक चव्हाण आणि सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर होते.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या जनतेने विरोधकांना सन्मानाची जागा दिली, शरद पवारांनी मानले आभार
साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. विधानसभा निवडणुकीत रामराजे राष्ट्रवादीवर नाराज असल्याचे चित्र होते. त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला होता. पक्षात घालमेल होत असल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा होत्या. मात्र त्यांनी राष्ट्रवादीतच थांबण्याचा निर्णय घेऊन उदयनराजे यांच्या विरोधात आक्रमक प्रचार केला होता. त्यानंतर होणारी ही भेट महत्वाची ठरणार आहे.