ETV Bharat / state

'ना चोर ना चौकीदार, मी तर बेरोजगार'.. राष्ट्रवादीचे रस्तारोको आंदोलन; शेकडो कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात - पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग

पुणे-मुंबई महामार्ग रोखून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. वाढती बेरोजगारी, महापरिक्षा पोर्टल रद्द करा, जुन्या कायद्याप्रमाणे पोलीस भरती या मागण्या होत्या.

राष्ट्रवादीच्यावतीने रस्तारोको आंदोलन
author img

By

Published : Aug 28, 2019, 10:22 AM IST

Updated : Aug 28, 2019, 10:45 AM IST

पुणे - महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. यावर उपाययोजना करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी उर्से टोल नाका येथे पुणे-मुंबई महामार्ग रोखून धरला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक वळवण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला नाही. दरम्यान, शंभरच्यावर आंदोलनकर्त्यांना तळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राष्ट्रवादीच्यावतीने रस्तारोको आंदोलन

आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी शेकडो पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही मिनिटे रोखून धरला होता. वाढती बेरोजगारी, महापरिक्षा पोर्टल रद्द करा, जुन्या कायद्याप्रमाणे पोलीस भरती करा अश्या विविध मागण्यांसाठी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी काही मिनिटे ठिय्या मांडला. मात्र, याचा परिणाम वाहतुकीवर झाला नाही. 'ना चोर ना चौकीदार मी तर बेरोजगार', 'गाजर नको रोजगार हवा', 'नरेंद्र देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र' अश्या विविध घोषणा कार्यकर्ते देत होते. अखेर काही मिनिटे महामार्ग रोखल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत मार्ग खुला करण्यात आला.

Intro:mh_pun_01_expresway_av_mhc10002Body:mh_pun_01_expresway_av_mhc10002

Anchor:- विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उर्से टोल नाका येथे पुणे-मुंबई महामार्गावर आंदोलन करत महामार्ग रोखून धरला होता. यावेळी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबईहुन पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक वळवण्यात आली होती, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला नाही. दरम्यान, आंदोलन कर्त्यांना रोखण्यासाठी शेकडो पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. शंभर ते दीडशे आंदोलनकर्त्यांना तळेगाव पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग राष्ट्रवादी काँग्रेस युवा संघटनेने काही मिनिटे रोखून धरला होता. वाढती बेरोजगारी, महापरिक्षा पोर्टल रद्द करा, जुन्या कायद्या प्रमाणे पोलीस भरती करा अश्या विविध मागणीसाठी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याला वेळीच आळा घालण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस युवा संघटनेने आज मंगळवारी पुणे-मुंबई महामार्ग रोखून धरला होता. महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी काही मिनिट ठिय्या मांडला होता. मात्र, याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही. ना चोर ना चौकीदार मी तर बेरोजगार, गाजर नको रोजगार हवा, नरेंद्र देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र अश्या विविध घोषणा कार्यकर्ते देत होते. अखेर काही मिनिट महामार्ग रोखल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत मार्ग खुला करण्यात आला. Conclusion:
Last Updated : Aug 28, 2019, 10:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.