पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जेव्हा किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक झाला. तेव्हा काही घटकांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यास वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला. पण या राज्यातील जनतेने पहिल्यांदा सत्तेवर बसलेल्या आपल्या राजाची भूमिका अंतःकरणापासून स्वीकारली. छत्रपती शिवाजी महाराज जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे पाहिले राजे होते, असे मत राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात सोहळा उत्साहात पार पडला : किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1676 ला राज्याभिषेक झाला. मोठ्या थाटामाटात राज्याभिषेकाचा सोहळा हा पार पडला. या ऐतिहासिक क्षणाची सदैव स्मृती राहावी, या हेतूने दरवर्षी ६ जून रोजी किल्ले रायगडावर भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. तसेच आज राज्यातील सर्वच ठिकाणी शिवराज्यभिषेक सोहळा हा उत्साहात पार पडत आहे. पुण्यातील लालमहाल येथे अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी पवार यांच्या हस्ते धान्य, शस्त्र, तसेच फळ आणि ज्या-ज्या शिवराज्यभिषेक सोहळ्यात वस्तू वापरण्यात आल्या त्यांचे पूजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जेव्हा किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराज जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे पाहिले राजे होते. - शरद पवार
देशाच्या कानाकोपऱ्यात शिवाजी महाराज : यावेळी शरद पवार म्हणाले की, आजचा दिवस हा ऐतिहसिक दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आजच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांनासाठी हे राज्य स्वीकारले. आज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलो तरी सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील राजा कोण असे विचारले तर ते शिवाजी महाराज यांचे नाव प्रामुख्याने घेतात. अनेकांनी राज्य केले पण त्यांनी त्यांच्या घराण्याच्या नावावर राज्य केले. पण शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकच ध्येय होत की, शेवटच्या माणसापर्यंत मदत मिळाली पाहिजे.
रायगडावर जाण्याचा मार्ग बंद : आज रायगडावर क्षमतेपेक्षा शिवप्रेमी जमले आहेत. दुसरीकडे महाड ते रायगड वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांनी रायगडावर जाण्याचा मार्ग बंद केला आहे. दुर्गराज रायगडवर सध्या जवळपास अडीच लाख लोक उपस्थित आहेत. रायगडाच्या खाली जवळपास ५० - ७५ हजार लोक आलेले आहेत.
हेही वाचा -