पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासोबत तब्बल 40 आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र अजित पवार यांच्या बंडाबाबत शरद पवार रान उठवणार असल्याचे दिसून येत आहे. थोड्याच वेळात शरद पवार हे कराड येथील प्रितीसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. पुण्यातील मोदी बाग येथील त्यांच्या निवास्थानी मोठ्या संख्येने ज्येष्ठ तसेच तरुण कार्यकर्ते हे जमले आहेत. ते आम्ही सदैव पवार साहेबांच्या सोबत असल्याचे सांगत आहे. यावेळी आमदार रोहित पवार, संदीप क्षीरसागर हे देखील उपस्थित झाले आहे.
आजचे राजकारण खूप गलिच्छ : यावेळी रोहित पवार म्हणाले की, जे काही काल झाले आणि गेल्या वर्षभरात जे काही या राज्यात घडत आहे. ते बघितल्यावर मतदारांचे म्हणणे आहे की, आजचे राजकारण हा खूप गलिच्छ झाले आहे. मतदारांनाच मतदान केल्याचे चुकीचे वाटत आहे. आमच्या सारख्या देखील नवीन आमदारांना आत्ता वाटत आहे की, राजकारणात येऊन चूक केली का? लोकांच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा स्वतः ची खुर्ची कशी वाचवता येईल हाच प्रयत्न करत आहे, असे यावेळी रोहित पवार म्हणाले.
खुर्ची वाचविण्याचे काम सुरू : पक्ष फुटला तरी आम्ही लढत राहणार आहोत. लढणे हे महाराष्ट्राच्या रक्तात लिहिले आहे. राजकारणात येऊन चूक केली का? अशी भावना निर्माण झाली आहे. राजकारण गलिच्छ झाले आहे, अशी मतदारांची भावना आज आहे. लोकांचे काम सोडून खुर्ची वाचविण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत आम्ही उपस्थित राहणार आहोत. लोकांचे बहुमत भाजपकडे राहिलेले नाही. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीला फोडले जाईल, असा अंदाज होता. अजित पवार जातील याचा कुणालाही अंदाज नव्हता.
हेही वाचा :
- Maharashtra Political Crisis : शरद पवार आज प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे घेणार दर्शन, जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता
- NCP political crisis: अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ८ नेत्यांची आमदारकी रद्द करा, राष्ट्रवादीची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी
- Maharashtra Political Crisis : अजित पवारांच्या भूमिकेनंतर शरद पवार यांना राहुल गांधींसह देशातील विविध नेत्यांचे फोन