पुणे : महाराष्ट्रातील 16 आमदारांच्या पात्रतेचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हे प्रकरण आणि त्याचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात लागण्याची शक्यता सध्या वर्तविली जात आहे. न्यायालयाचा निकाल शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात गेल्यास महाराष्ट्रात सध्या अस्तित्व असलेले शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याची शक्यता आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सोशल मिडियावरील राष्ट्रवादी कॉंग्रेसच चिन्ह घडयाळ आणि पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह स्वतःचा फोटो असलेले वॉलपेपर डिलिट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच अजित पवार यांच्याबरोबर चाळीस आमदारांचा पाठिंबा देतील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच अजित पवार यांनी सोशल मीडियावरील पक्षाचे चिन्ह आणि पक्षप्रमुख यांच्याबरोबर असलेला स्वतःच फोटोच वॉलपेपर काढल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. तसेच हे चिन्ह आणि फोटो हे गेल्या काही दिवसांपूर्वीच काढले असल्याचेदेखील सांगितल जात आहे. त्यामुळे अजित पवार काय निर्णय याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सविस्तर थोड्याच वेळात