ETV Bharat / state

दौंडमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन - Daund taluka district pune

देशातील पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात दौंड शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दौंड तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन
author img

By

Published : Jul 3, 2021, 12:31 AM IST

दौंड (पुणे) - देशातील पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात दौंड शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दौंड तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ जनतेवर अन्याय करण्याची मालिकाच आहे. या दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किंमती कमी करण्यात याव्या, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. दौंड तहसीलदार कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष आप्पासो पवार, शहराध्यक्ष गुरमुख नारंग, सोहेल खान, प्रशांत धनवे यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.