पुणे - राज्य दहशतवाद विरोधी पथकाने पिंपरी-चिंचवडमधून अटक केलेला कथित माओवादी नेता मुरलीधरन याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जमीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर केरळचा रहिवासी असलेल्या मुरलीधरनला मुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील राहुल देशमुख यांनी दिली आहे.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून मुरलीधरन याला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. यावेळी त्याच्याकडून काही महत्वाची कागदपत्रे देखील जप्त करण्यात आले होते. सद्या मुरलीधर यांच्याविरुद्ध पुण्याच्या न्यायालयामध्ये खटला सुरू आहे.
मुरलीधरन याने उच्च न्यायलयामध्ये जामीनसाठी अर्ज केला होता. तो अर्ज उच्च न्यायालयाने मंजूर केला. तेव्हा याच्या विरुद्ध राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यामुळे मुरलीधरण याला मुक्त करण्यात आले आहे.