ETV Bharat / state

पिंपरीत उत्तरप्रदेश येथील महिला अत्याचाराच्या विरोधात 'घंटानाद'

उत्तर प्रदेशातील बदाऊ जिल्ह्यात 3 जानेवारीला एका 50 वर्षीय अंगणवाडी सेविकेवर बलात्कार करून, त्या महिलेची हत्या करण्यात आली होती. मात्र, अजूनही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. याचा निषेध म्हणून आज (शनिवार) राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने पिंपरी पोस्ट कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्या
राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्या
author img

By

Published : Jan 9, 2021, 10:12 PM IST

Updated : Jan 9, 2021, 10:35 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. याविरोधात शनिवारी (दि. 9 जाने.) पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पिंपरी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पत्र पाठवण्यात आले आहेत.

बोलताना राष्ट्रवादी महिला काँग्रेच्या अध्यक्षा
उत्तर प्रदेश सरकार विरोधात पिंपरीत घंटानाद आंदोलन

उत्तर प्रदेशातील बदाऊ जिल्ह्यात 3 जानेवारीला एका 50 वर्षीय अंगणवाडी सेविकेवर बलात्कार करून, त्या महिलेची हत्या करण्यात आली होती. मात्र, अजूनही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. याचा निषेध म्हणून आज (शनिवार) राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने पिंपरी पोस्ट कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेशातील योगी सरकार हे तेथील गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे आरोप राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केला आहे.

महिला अत्याचाऱ्याच्या यादीत उत्तरप्रदेश अग्रेसर

देशभरात होत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेत उत्तर प्रदेश राज्य अग्रेसर असल्याचे देखील पिंपरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष वैशाली काळभोर यांनी म्हटले आहे. महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पोष्टद्वारे पत्र पाठविले आहे. यावेळी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

हेही वाचा - पुण्यातील एआरडीई आणि भारतफोर्जला लष्कर प्रमुखांनी दिली भेट

हेही वाचा - स्थानिकांना विचारात घेऊनच नामांतराचा निर्णय घ्यावा - रोहित पवार

Last Updated : Jan 9, 2021, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.