ETV Bharat / state

National Engineers Day २०२३ : अभियांत्रिकी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; अभिमान पुरस्काराचं वितरण

National Engineers Day २०२३ : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात अभिमान पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तंत्रज्ञान विद्यापिठाचा नावलौकीक असल्याचं स्पष्ट केलं. राष्ट्रीय अभियांत्रिकी दिनाच्या निमित्तानं हे पुरस्कार वितरित करण्यात आले.

National Engineers Day 2023
अभिमान पुरस्काराचं वितरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2023, 10:27 AM IST

पुणे National Engineers Day २०२३ : अभियांत्रिकी क्षेत्रात अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तंत्रज्ञान विद्यापिठाचा नावलौकीक आहे. या विद्यापीठाला 170 वर्षाची परंपरा आहे. त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रज्ञान विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं.

National Engineers Day 2023
अभिमान पुरस्काराचं वितरण

माजी विद्यार्थी नियामक मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे यांच्यावतीनं अभियांत्रिकी दिनाच्या निमित्तानं आयोजित अभिमान पुरस्कार वितरण समारंभात चंद्रकांत पाटील हे बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुधीर आगाशे, माजी विद्यार्थी नियामक मंडळाचे अध्यक्ष भरत गीते, बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, सचिव डॉ. सुजित परदेशी, नियामक मंडळाचे सदस्य, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

अभिमान पुरस्कार वितरण समारंभ : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिमान पुरस्कार विजेत्यांचकौतुक केलं. अभिमान पुरस्कार विजेत्यांचा संस्थेलाही अभिमान आहे. विद्यापीठानं केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांना न देता, त्यांनी संस्कारमूल्य जपण्याचंही मार्गदर्शन करावं, असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. देशात नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी होत असून मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचं ज्ञान चांगल्याप्रकारे होऊन, त्यांची संशोधनाची वृत्ती वाढण्यास मदत होईल. नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमूख शिक्षणावर देखील भर देण्यात येत असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा : अभियांत्रिकी महाविद्यालयाला शासनानं स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा दिलेला असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर इथं आवश्यकतेनुसार विविध अभ्यासक्रम घेतले जात असून त्याचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विद्यापीठाकडं स्पर्धेची भावना असली पाहिजे. तंत्रज्ञान विद्यापीठाचं भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये रूपांतर करण्यासाठी विद्यापीठानं ज्ञान-तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत सहभागी होऊन शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करावी. विद्यापीठाचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

जागतिक दर्जा मिळण्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित : विद्यापीठातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची कौटुंबिक पार्श्वभूमी नसते. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येक सेमिस्टरमध्ये दोन तास लेक्चर दिल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाचा चांगला फायदा होईल. विद्यापीठाला जागतिक दर्जा मिळण्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित असल्याचं विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुधीर आगाशे यांनी यावेळी सांगितलं. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी अशिष अचलेरकर, अरूण कुदळे, विवेक फणसाळकर, चेतन धारिया, डॉ. रवी भटकळ व डॉ. विजय पटेल यांना अभिमान पुरस्कारानं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.

हेही वाचा :

  1. NAAC Assessment : शेकडो महाविद्यालयांची मान्यता रद्द होण्याची शक्यता, 'नॅक' मूल्यांकन नसल्यामुळं कारवाईचे आदेश
  2. Ashok Saraf : अशोक सराफ यांचा 'शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कारा'ने गौरव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.