ETV Bharat / state

नारायणगाव टोमॅटोचा बाजार नियमांचे पालन करत सुरु राहणार - Junnar lockdown news

नारायणगाव बाजारात आलेला टोमॅटो अनेक राज्यात विक्रीसाठी जात असल्याने नारायणगाव टोमॅटो बाजार सुरु ठेवण्यात आला आहे.सोशल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे शेतकरी व व्यापारी वर्गाने पालन करण्याचे आवाहन सभापती काळे यांनी केले आहे.

Narayangaon Market Committee
नारायणगाव टोमॅटोचा बाजार राहणार सुरु
author img

By

Published : Jul 15, 2020, 2:02 PM IST

जुन्नर(पुणे)- तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यातून टोमॅटोची सर्वाधिक आवक होत आहे. यामुळे लॉकडाऊनमध्येही सोशल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे पालन करत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नारायणगाव टोमॅटो व भाजीपाला मार्केट आजपासुन सुरू राहणार असल्याची माहिती सभापती संजय काळे यांनी दिली.

नारायणगाव उपबाजार केंद्रात जुन्नर, आंबेगाव, खेड, तालुक्‍यातून टोमॅटो विक्रीसाठी येत असतात. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये पणन महामंडळ व राज्य शासनाने शेतीमालावर खरेदी विक्रीकर बंदी घातली नसल्याने शेती मालाची आवक-जावक सुरू ठेवण्यात आली आहे.

नारायणगाव बाजारात आलेला टोमॅटो अनेक राज्यात विक्रीसाठी जात असल्याने नारायणगाव टोमॅटो बाजार सुरु ठेवण्यात आला आहे. पुणे,पिंपरी चिंचवडसह पुण्याच्या ग्रामीण भागात लॉकडाऊन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात शेती हाच शेतक-यांचे आर्थिक स्त्रोत असल्याने व शेतीचा माल नाशवंत असल्याने शेतीमाल पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे.

सोशल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे शेतकरी व व्यापारी वर्गाने पालन करण्याचे आवाहन सभापती काळे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.