पुणे : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कर्नाटकच्या निकालावरून मोदींवर टिका केली आहे. याबाबत, नको त्या ठिकाणी तुम्ही विषय काढत आहे. आज आम्ही नोकरी द्यायला आलो आहे. ज्या माणसाने अडीच वर्षात एकही नोकरी दिली नाही. एकही तरुणांसाठी उपक्रम राबविला नाही. रिकामटेकडा माणूस अडीच वर्षात दोन तास मंत्रालयात गेला. त्याची बरोबरी मोदी यांच्याशी कशी होईल, अशी टीका केंद्रीय राज्य मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
रोजगार मेला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशातील तब्बल ७१ हजार उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येत आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देशभरातील ४५ ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पुण्यात देखील केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 ऑक्टोबर 2022 पासून रोजगार मेळा हा कार्यक्रम जाहीर केला. आत्तापर्यंत 3 लाख तरुणांना रोजगार देण्यात येत आहे. सार्वजनिक पातळीवर हा कार्यक्रम होत असल्याचे यावेळी राणे म्हणाले.
त्यांनी लोकप्रियतेची भाषा करावी : बारसूबाबत राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना विचारले पाहिजे की का विरोध करत आहे? मी याआधी म्हटले होते की, कोळश्यापासून वीज बनवणारे 34 उत्पादक हे उद्धव ठाकरे यांना भेटले होते. तेव्हा देखील त्यांनी विरोध केला होता. आत्ता देखील सुपारी घेऊन विरोध करत आहे, असे देखील यावेळी राणे म्हणाले. कर्नाटकच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यानी केलेल्या विधानावर राणे म्हणाले की, त्यांचे आमदार खासदार हे किती आहे? आमच्या मोठ्या पक्षाला जिथे आमचे 302 खासदार आहे, राज्यात 105 आमदार आहे. त्यांचे 1 आमदार आहे. त्यांनी लोकप्रियतेची भाषा करावी, असा टोला यावेळी राणे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
उद्धव ठाकरेंना दु:ख : सोळा आमदारांच्या बाबतीत शिवसेनेच्या वतीने नरहरी झिरवळ यांना निवेदन देण्यात आले आहे. यावर राणे म्हणाले की, कोण तो झिरवळ हिरवळ? तो उपाध्यक्ष आहे. पहिले अध्यक्ष आहे, आणि अध्यक्ष निर्णय घेणार आहे. झिरवळ हे आत्ता पिवळे झाले आहे. देशातील इतर राज्यातील नेते मंडळी हे उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहे. यावर राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना खूप दुःख असून त्यांना सात्वन करण्यासाठी ते येत आहे. या सगळ्यांचे मिळून हे 60 खासदार पण नाही, मग त्यांची गिणती कशी करायची? असे यावेळी राणे म्हणाले.