पुणे - शरद पवार हे माझे हिरो आहेत. पवार राजकारणातील चाणक्य असून तेच चंद्रगुप्त असल्याचे जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर म्हणाले. गेल्या 50 वर्षात शरद पवार यांनी एकही चंद्रगुप्त तयार केला नाही हे दुर्दैव आहे. पण चंद्रगुप्त ही तेच आणि चाणक्य ही तेच आहेत. शेतकऱ्यांना राजकारण्यांकडून दिलासा हवा आहे. त्यांना कर्जमाफीची भीक नको आहे. आभाळातील बाप रागावला म्हणून शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट झाल्याचे नाना म्हणाले.
हेही वाचा - मन्या सुर्वे हा माझा मामेभाऊ - नाना पाटेकर
नाना म्हणाले, शरद पवार हे माझे हिरो आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात केवळ दहा वर्षाचा फरक आहे. शरद पवार हे महाराष्ट्रासाठी काही तरी करतील अस नेहमी वाटायच. एकदा शरद पवार यांना खासगीत बोललो होतो, की शरदराव तुम्ही राजकारणातील चाणक्य आहात. राजकारण कस करावं हे माहीत आहे, यात तुम्ही फार हुशार आहात. एकच दुर्दैव आहे की, गेल्या 50 वर्षात एकही चंद्रगुप्त तयार नाही केला. पण राजकारणातले चंद्रगुप्त ही तेच आहेत आणि चाणक्य ही तेच असल्याचे नाना म्हणाले.
हेही वाचा - पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; सहा लाखांच्या मुद्देमालासह 18 अटकेत
नाना पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी आत्महत्याचा क्षण थांबवून ठेवायला हवा. प्रत्येकाला आपण नाही पुरे पडू शकत. निदान दोन गोष्टी बोलू शकतो. राजकारण्यांनी भरपाई दिली नाही तरी चालेल पण खांद्यावर हात ठेवा. तो दिलासा पाहिजे, नुसती कर्जमाफी नाही, शेतकरी काय भिकारी आहे का?शेतकऱ्यांच्या मालाला तुम्ही म्हणाल ती किंमत अस कस चालेल. मॉलमध्ये करता का घासाघीस? शेतकऱ्यांकडे भाव करू नका. जर कांद्याचे भाव वाढले की सगळं वेळापत्रक बिघडलं. यावर विचार करण्याची गरज आहे, अस ही नाना म्हणाले.