ETV Bharat / state

Nagar Kalyan Highway Accident : नगर कल्याण महामार्गावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; अनेक प्रवासी जखमी - वाहतूक खोळंबली

Nagar Kalyan Highway Accident : कल्याण-नगर महामार्गवर खुबी गावाजवळ मालवाहू ट्रक व एसटी बसची समोरा समोर धडक बसून अपघात झाला. या अपघातात पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

Nagar Kalyan Highway Accident
कल्याण-नगर महामार्गवर अपघात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 10:43 AM IST

पुणे Nagar Kalyan Highway Accident : नगर-कल्याण महामार्गावर माळशेज घाटात शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये बसमधील जवळपास पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. माळशेज घाटात अपघात झाल्यानं वाहतूक खोळंबली आहे. दरम्यान या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नेमका कसा घडला अपघात : कल्याण–शिरोली बस ही शिरोली इथं मुक्कामी येत होती. कल्याणवरुन जुन्नरच्या दिशेनं ही बस येत असताना ट्रक कल्याणच्या दिशेनं जात होता. अपघातप्रसंगी ट्रक आणि बस हे दोन्ही वाहनं समोरासमोर आले आणि त्यांची धडक झाली. एसटी आणि ट्रकची धडक इतकी भीषण होती की, ट्रक जागीच पलटी झाला आणि बसचंही मोठं नुकसान झालं आहे. तसेच या जोरदार धक्क्यानंतर बसमधील सर्वच जण घाबरले. अपघातात ट्रक चालकासह अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींंना करण्यात आलं रुग्णालयात दाखल : दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंंतर तात्काळ जखमी प्रवाशांना उपचारासाठी आळेफाटा,ओतुर, नारायणगाव इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं.

हेही वाचा :

  1. Mumbai Pune Expressway Accident : कंटेनर उलटल्यानं मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू
  2. Tanker Accident Pune: दिवे घाटात टँकरची दोन दुचाकी स्वारांना धडक..दोन जणांचा जागीच मृत्यू
  3. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी टँकर दुचाकीचा भीषण अपघात, महिलेचा जागीच मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.