पुणे : नांदेडच्या महिपाल पिंप्री येथे नात्यातील मुलासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीचा कुटुंबातील लोकांनी खून केला आहे. हे कृत्य अतिशय निंदनिय अमानवी, माणुसकीला काळीमा फासणारे आहे. नात्यातील मुलाशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून तिच्याच कुटुंबियातील मुलीची हत्या केली आहे.
कुटूंबानेच केली हत्या : या घटनेत मुलीचे वडील, भाऊ, दोन चुलतभाऊ, मामा यांचा सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांनी मुलीचा खुन केल्यानंतर मृतदेहाची विल्लेवाट लावण्यासाठी मुलीचा मृतदेह जाळण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी अंत्यसंस्काराची राख देखील पाण्यात टाकली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात हत्या करणे, पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे.
समाजात रोष : या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून समाजात रोष निर्माण झाला आहे. अशा घटना निंदनीय तसेच संतापजनक असल्याची भावना निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत राज्यातील मंत्र्यांनी पालकांबरोबर बसून काम करण्याची गरज असल्याचे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. समाजात बदल होण्यासाठी सर्वांनी सामाजिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पालकांचे मत बदलण्यासाठी समाजात बदल घडवण्यासाठी जनजागृती करण्याची आवशक्याता असल्याचे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.
समांजस्याची भूमीका : कुटुंबात काही वाद किंवा काही प्रश्न असतील तर, ते कुटुंबियांनी समांजस्याची भूमिका घेत सोडवणे गरजेचे होते. पण तसे न घडतास कुटुंबियांनी टोकाचे पाऊल उचलले. ही घटना निंदनिय आहे. राज्य महिला आयोग या घटनेचा पाठपुरावा करीत असून आरोपींना कडक कारवाई व्हावी यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. समाजात अशा घटना घडू नये यासाठी आपण प्रयत्नशिल असायला हवे. माणूस म्हणून अशा घटना टाळायला हव्या असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.