पुणे - पुण्यातील 'त्या' चिमुरडीचे अपहरण करून खून करणाऱ्याला पोलिसांनी चोवीस तासात जेरबंद केले आहे. मृत मुलीच्या वडिलांसोबत असलेल्या पुर्ववैमनस्यातून हे कृत्य केल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले आहे. प्रथमेश गायकवाड (वय 19) असे आरोपीचे या आरोपीचे नाव आहे. शवविच्छेदन अहवालात चिमुरडीवर बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृत मुलीच्या अंगावर सात आठवेळा ठिकाणी चावल्याच्या खुना आहेत. त्यांची तपासणी करण्यासाठी पोलीस 'डेंटल फॉरेन्सिक' तज्ञाची मदत घेण्यात येणार आहे.
आरोपी मूळचा जेजुरीचा रहिवासी आहे. तो काहीही कामधंदा न करता मागील काही दिवसांपासून पुणे स्टेशन परिसरात राहत होता. काही दिवसांपूर्वी मृत मुलीच्या वडिलांनी आणि मामाने आरोपीला मारहाण केली होती. याचाच राग मनात धरून त्याने हे कृत्य केले. मंगळवारी पहाटे ही चिमुरडी आईजवळ झोपली असताना आरोपीने तिला उचलून रेल्वे यार्डातील उभ्या असलेल्या रेल्वेत नेले. जात असताना आरोपीने मुलीच्या अंगावर सात ते आठ ठिकाणी चावे घेतले. हे चावे इतके भीषण होते की, शरीरावर अक्षरक्ष: त्याचे दात उमटले होते. यानंतर त्याने रेल्वेच्या दारावर तिचे डोके आपटले आणि तिला रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच टाकून निघून गेला.
तपासादरम्यान पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील 60 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे रेल्वे स्थानकावरुन दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपीला अटक केली. त्यानंतर 10 मिनिटातच त्याने गुन्हा कबूल केला.