ETV Bharat / state

पुण्यात हत्येचे सत्र सुरुच, पॅरोलवर सुटलेल्या आरोपीचा निर्घृण खून - murder case in yerawada

पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या आरोपीचा टोळक्याने हत्याराने वार करुन खून केला. नितिन शिवाजी कसबे (वय २२) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल केला असून चार जणांना ताब्यात घेतले.

Murder of accused who escaped on parole
पॅरोलवर सुटलेल्या आरोपीचा निर्घुण खून
author img

By

Published : May 28, 2020, 11:44 AM IST

पुणे - मागील काही दिवसांपासून सुरू असलेले पुण्यातील हत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. अशात बुधवारी रात्री येरवड्यात आणखी एक खून झाला. पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या आरोपीचा टोळक्याने हत्याराने वार करुन खून केला. नितिन शिवाजी कसबे (वय २२) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

येरवडा पोलिसांनी याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल केला असून चार जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आकाश कनचिले, आकाश सपकाळ, आकाश मिरे, गणेश आडसूळ, निखिल कांबळे, चेतन भालेराव, ओंकार सोनवणी अशा १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नितीन कसबे एका गुन्ह्यात सहा महिन्यांपूर्वी येरवडा कारागृहात गेला होता. त्याच्यावर मारहाणीसह इतर अनेक गुन्हे दाखल होते.

बुधवारी (२८ मे) संध्याकाळी त्याची पॅरोलवर सुटका करण्यात आली. त्याच रात्री नितीन एका मित्राच्या घरी गेला होता. रात्री अकराच्या सुमारास मित्रांसोबत पायी घरी निघाला होता. त्याचवेळी शादलबाबा चौकाजवळ रेड्डी हॉटेलसमोर सोळा जणांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या डोक्यावर, हातावर, पायावर वार करण्यात आले होते. लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर पुणे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. लॉकडाऊनच्या काळात पुण्यात हत्येच्या आठ घटना घडल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.