पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी फार मोठी समस्या झालेली आहे आणि त्याच्यावरून आता महापालिका पीएमआरडी महामेट्रो ( Municipal PMRD Mahametro) या विभागाकडून एकमेकांव लेटर वॉर थांबताना दिसत नाही. पुण्यातील वाहतूक कोंडीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील ( Guardian Minister Chandrakant Patil ) यांनी सर्व मुलांना सहकार्याने तोडगा काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्ताने महानगरपालिकेला पत्र लिहून बीआरटी मार्ग बंद करण्यास सांगितले होते.
पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी : त्यानंतर पीएमपीएलने सुद्धा एक पत्र आयुक्तांना लिहिले असून बीआरटी मार्ग मुळे वाहतूक कोंडी होत नसून त्याचे नियोजन योग्य केले तर वाहतूक कोंडी होणार नाही, असे पत्र महानगरपालिकेला दिले आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीवरून अधिकाऱ्यांमध्ये लेटरवॉर सुरू आहे. परंतु प्रत्यक्ष काम नाही अशी पुण्यात चर्चा होत असताना आता पुणे महानगरपालिकेने पुणे मेट्रोच्या कामामुळे जी अडचण होते, त्या संदर्भात एक पत्र पीएमआरडीला दिलेले आहे आणि त्यात उल्लेख केलेला आहे की, पुणे महानगरपालिका आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त आणि वाहतूक विभाग यांनी जे परीक्षण केले त्यातून असे समोर आलेला आहे, की पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
मोठी वाहतूक कोंडी : पुणे महामेट्रोचे जे काम चालू आहे, तेथेही पत्रे मारण्यात आलेले आहेत. त्यांच्या ठिकाणी मशनरी चे काम आहे. त्या ठिकाणी ते योग्य आहे परंतु जिथे काम नाही अशा ठिकाणी सुद्धा हे बॅरिकेट्स आणि पत्रे मारलेले आहेत, ते काढण्यात यावेत म्हणजे ट्राफिक होणार नाही. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे त्या पत्रात म्हटलेले आहे. त्यामुळे पुण्यामध्ये अधिकाऱ्यांमध्येच लेटर वॉर सुरू असल्याची चर्चा आहे